रिक्षाचालकाचा मुलगा मोहम्मद सिराजची गरुडझेप

रिक्षाचालकाचा मुलगा मोहम्मद सिराजची गरुडझेप

ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाचे खेळाडू भारतात परतले. यानंतर हे खेळाडू आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने शानदार कामगिरी केली. या विजयाच्या आनंदात मोहम्मद सिराजने स्वत:ला बीएमडबल्यू गाडी भेट केली आहे. सिराजने याबाबतची माहिती इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत दिली आहे. (team india faster bowler mohammed siraj gifted to himself bmw car after australia tour)

सिराजचं गाड्यांवर विशेष प्रेम आहे. काही वर्षांपूर्वी सिराज प्लाटिना (Platina) चालवायचा. तेव्हा त्याच्याकडे पंक्चर काढण्यासाठीही पैसे नसायचे. अशा खडतर परिस्थितीवर सिराजने मात केली. त्याचे वडिल मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते. आपल्या मुलाने देशाचं प्रतिनिधित्व करावं, असं त्यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. सिराजला हवी असलेली प्रत्येक गोष्ट त्यांनी पुरवली.

सिराजनेही कठोर मेहनत आणि संघर्षाच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवून वडिलांचे स्वप्न पूर्ण केलं. सिराजने ऑस्ट्रेलियावरील विजयानंतर महागडी BMW खरेदी केली. ते पाहण्यासाठी त्याचे वडिल नाहीत. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना सिराजच्या वडिलांचं फु्प्फुसाच्या आजाराने निधन झालं होतं. दुखाचा डोंगर कोसळला असतानाही सिराज टीम इंडियासोबतच राहिला. त्याच्या या निर्णयामुळे सर्वच स्तरातून त्याचं कौतुक करण्यात आलं.

वडिलांना श्रद्धांजली

सिराज ऑस्ट्रेलियाहून हैदराबादमधील विमानतळावर पोहचला. यानंतर तो विमानतळावरुन थेट क्रबरस्तानात पोहचला. सिराजने आपल्या वडिलांच्या कबरीवर फुले वाहून श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्याने नमाज अदा केली. वडिलांना श्रद्धांजली वाहताना सिराज भावूक झाला होता.

admin