या कारणामुळे मालायलाकाने घेतला होता अरबाझ सोबत घटस्फोट, म्हणाली- पूर्वी कमी होती पण आता वाढत चाललीये…

या कारणामुळे मालायलाकाने घेतला होता अरबाझ सोबत घटस्फोट, म्हणाली- पूर्वी कमी होती पण आता वाढत चाललीये…

अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा अनेकदा तिच्या नात्याबद्दल चर्चेत असते. अर्जुन कपूरसोबतचे तीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे स्टार कपल देखील एकमेकांचे फोटो शेअर करून आपले प्रेम व्यक्त करतात. मात्र घटस्फोटापूर्वी अरबाज आणि मलायका यांना बॉलिवूडचे पावर कपल म्हटले जात होते. त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांना हादरवून सोडले होते.

अरबाज आणि मलायका 2017 मध्ये वेगळे झाले. घटस्फोटाच्या कारणांवर कोणीही उघडपणे बोललेले नाही, पण वेळोवेळी दोघांनीही आपले मतभेद जगासमोर मांडले. एकदा मलायका अरोरा शोमध्ये सर्वांसमोर म्हणाली होती की, ती अरबाजच्या एका सवयीमुळे नाराज आहे आणि ही सवय काळाबरोबर वाढत आहे.

फराह खानचा भाऊ साजिद खान याला मलायका आणि अरबाजने मुलाखत दिली होती. यादरम्यान दोघांनी एकमेकांची खूप प्रशंसा केली होती आणि अनेक वाईट गोष्टीही बोलल्या होत्या. या ठिकाणी साजिद खान मलायकाला अरबाजबद्दल एक गोष्ट सांगण्यास सांगतो जी तुुुला सर्वात जास्त आवडते आणि एक गोष्ट अशी जी तुला अजिबात आवडत नाही.

यावर उत्तर देताना मलायका म्हणते की, मला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे त्याची प्रेम करण्याची पद्धत… तो त्यांच प्रेम कधीच व्यक्त करत नाही, पण तरीही मला समजते. कदाचित हा आमच्या बाँडिंगचा परिणाम असेल. ज्या प्रकारे तो मला आनंदी ठेवतो आणि मला नेहमी हसवतो, हीच कदाचित अरबाजची सर्वात चांगली गोष्ट आहे.

मलायका अरोरा पुढे म्हणते, ‘आता मी त्याच्याबद्दल सर्वात वाईट गोष्टीबद्दल बोलले तर तो खूप निष्काळजी आहे. तो कुठलीही वस्तू घरात कुठेही ठेवतो आणि यामुळे मी खूप अस्वस्थ झाले आहे. पूर्वी त्याची निष्काळजी थोडी कमी होती, पण आता हळूहळू ती वाढत आहे. या प्रश्नावर अरबाज खान म्हणतो, ‘मलायका अनेक गोष्टी व्यवस्थित सांभाळते. मलायका आपली चूक कधीच मान्य करत नाही. हे खरे मला खूप त्रास देते.

मलायका अरोराने 1998 मध्ये अभिनेता अरबाज खानसोबत लग्न केले होते. पण अरबाज खान आणि मलायका अरोरा 19 वर्षांनंतर त्यांच्या वैवाहिक जीवनातील चढ-उतारांमुळे एकमेकांपासून वेगळे झाले. अभिनेत्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका आणि अर्जुन कपूर यांच्यातील जवळीक वाढू लागली.

admin