राज कपूरच्या ‘मेरा नाम जोकर’ ची ‘ती’ रशियन अभिनेत्री सध्या काय करतेय, पहा झालीये अशी हालत..

राज कपूरच्या ‘मेरा नाम जोकर’ ची ‘ती’ रशियन अभिनेत्री सध्या काय करतेय, पहा झालीये अशी हालत..

बॉलिवूडमध्ये असे बरेच चित्रपट बनतात ज्यात परदेशी कलाकारही कधीकधी महत्वाच्या भूमिका साकारताना दिसतात. तथापि, हिंदी चित्रपटात बॉलिवूड स्टार्समध्ये राहून आपली ओळख सोडणारे फारच कमी कलाकार आहेत. अशीच एक रशियन अभिनेत्री होती सेनीया रेबेंकिना, जिने राज कपूरच्या मेरा नाम जोकर या चित्रपटात एक छोटी परंतु विशेष भूमिका साकारली होती.

मात्र, या चित्रपटा नंतर सेनिया कोठेही दिसली नाही. आज, आम्ही आपल्याला या बातमीत सांगणार आहोत की सेनिया आता कुठे आहे आणि ती सध्या काय करीत आहे. 50 वर्षांपूर्वी, शो मॅन राज कपूर यांनी मेरा नाम जोकर हा महत्त्वाकांक्षी चित्रपट बनविला होता. या चित्रपटात बरीच मोठी स्टार मंडळी होती आणि हा चित्रपट राज कपूर यांच्यासाठी खूप खास होता.

चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे बॉक्स ऑफिसवर कामगिरी केली नसली तरी चित्रपटाच्या गाण्यांचे खूप कौतुक झाले. तसेच या चित्रपटात विशेष भूमिका साकारणार्‍या रशियन अभिनेत्री सेनिया रीबँकिना यांनाही खूप कौतुक प्राप्त झाले. मेरा नाम जोकर या सिनेमात बरीच मोठी कलाकारं होती, पण या मोठ्या कलाकारांपैकी अभिनेत्री सेनिया रेबेनकिनाने तिच्या छोट्या भूमिकेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

सेनिया रेबेन्किना, ज्या स्वत: ला व्यवसायाने बेली डान्सर म्हणून वर्णन करतात, त्यांनी या चित्रपटात सर्कस मध्ये काम करणाऱ्या कलाकाराची भूमिका केली होती. या चित्रपटातील त्यांची भूमिका फार मोठी नव्हती, परंतु चित्रपटाचा नायक राज कपूर यांच्यासोबत असलेल्या लव्ह स्टोरी सीनमुळे ती चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग बनली.

हा चित्रपट हिट नाही होऊ शकला आणि त्यामुळे सेनिया रेबेंकिना बॉलिवूडमधून गायब झाली. ती परत तिच्या देशात रुस ला वापस गेली. हळू हळू ती लोकांच्या मनातून दूर गेली. तथापि, काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत त्यांनी एक खास मुलाखत दिली आणि चित्रपटामधील आपल्या अनुभवाविषयी सांगितले.

सेनियाने सांगितले होते की राज कपूर त्या काळातले एक मोठा स्टार होते. अशा परिस्थितीत त्याच्याबरोबर स्क्रीन शेअर करणे ही मोठी गोष्ट होती. सेनिया पुढे म्हणाली की, ‘राज कपूर प्रत्येकाची पूर्ण काळजी घेत असत, पण कॅमेरा चालू होताच ते कडक बनत असायचे. प्रत्येकाने आपले कार्य परिपूर्णतेने करावे अशी त्यांना फक्त आशा होती.

ती सांगते की, ‘या चित्रपटामुळे कपूर खानदानाशी तिचे असे खास संबंध बनले जे आजही कायम आहेत आणि जेव्हा जेव्हा ती भारतात येत असे तेव्हा ऋषी कपूर, रणधीर कपूर, राजीव कपूर यांना ती भेटायची. तुम्हाला सांगतो की बेली डान्समुळेच सेनियाला राज कपूरच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. 50 वर्षांनंतरही तिने सराव सोडला नाही आणि बेली डान्स करत आहे. सध्या, सेनिया 75 वर्षांची आहे.

admin