कबीर सिंगमधील मराठमोळ्या अभिनेत्रीने केले न्यू ड फोटोशूट, सोशल मीडियावर झाला फोटो व्हायरल

कबीर सिंगमधील मराठमोळ्या अभिनेत्रीने केले न्यू ड फोटोशूट, सोशल मीडियावर झाला फोटो व्हायरल

शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला कबीर सिंग हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना भावला होता. या चित्रपटातील गाणी तर लोकांनी डोक्यावर घेतली होती. या चित्रपटात शाहिद आणि त्याच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीवर चित्रीत करण्यात आलेला एक सीन लोकांना प्रचंड आवडला होता.

शाहिदच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीच्या हातून चुकून काचेचा ग्लास फुटतो, त्यावर शाहिद तिच्या मागे मारायला धावतो. घरापासून ते बिल्डिंगच्या प्रवेशद्वारापर्यंत ही मोलकरीण जीव तोडून धावते. या चित्रपटातील ती मोलकरीण केवळ काहीच दृश्यांसाठी असली तरी ही मोलकरीण प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली होती. या चित्रपटातील या मोलकरणीच्या भूमिकेत एक मराठी अभिनेत्री झळकली होती.

या अभिनेत्रीचे नाव वनिता खरात असून सध्या ती चांगलीच चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे तिच्या नावाची चर्चा रंगली आहे. वनिताने एका कॅलेंडरसाठी चक्क न्यू* ड फोटोशूट केले आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून केवळ सामान्य लोकच नव्हे तर मराठी सिनेइंडस्ट्रीतील अनेकांनी यासाठी तिचे कौतुक केले आहे.

वनिताने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा बो ल्ड फोटो पाहून लोकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. पण अशाप्रकारचे फोटोशूट करण्यामागे एक खास कारण असल्याचे तिने तिच्या पोस्टद्वारे सांगितले आहे. तिने या फोटोद्वारे एक महत्त्वाचा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

आपल्या वजनाचा न्यूनगंड कुठेही न बाळगता वनिता खरातने हा फोटो शेअर केला आहे. वनिताने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करताना त्यासोबत लिहिले आहे की, मला माझ्या प्रतिभेचा अभिमान आहे. माझी आवड, माझा आत्मविश्वास, मला माझ्या शरीराचा अभिमान आहे … कारण मी, मी आहे.

वनिताने हा फोटो शेअर केल्यानंतर काहीच तासांत या फोटोला अनेक लाईक्स मिळाले असून अनेकांनी या फोटोवर कमेंट केले आहे. वनिताचा हा फोटो प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरुरकरने काढला आहे.

admin