‘या’ कारणामुळे डिप्रेशनमध्ये होता मयुरी देशमुखचा नवरा, दादरमधील मानसोपचार तज्ज्ञांकडे सुरू होते

एकीकडे अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आ-त्मह-त्येच्या धक्क्यातून त्याचे चाहते सावरलेले नाहीत आणि अद्याप त्याने आ-त्मह-त्या का केली, हे समजलेले नाही. त्यात दुसरीकडे अभिनेत्री मयुरी देशमुखचा नवरा आशुतोष भाकरेने आ-त्मह-त्या केल्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ माजली आहे.
आशुतोष भाकरेने बुधवारी 29 जुलैला नांदेडमधील राहत्या घरी ग-ळफा-स घेऊन आ-त्मह-त्या केली. पत्नी मयुरीसोबत ना मतभेद होते, ना त्याला म्हणावी तशी आर्थिक चणचण होती. तरीही आशुतोषने स्वत:चं आयुष्य संपवल्याने, कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
आशुतोषने डि-प्रेशनमध्ये आ-त्मह-त्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र त्याला नेमके कोणते नैराश्य होते, याचा उलगडा पोलीस करत आहेत. आशुतोष हा मागील वर्षभरापासून अपेक्षित असे काम मिळत नसल्याने प्रचंड नैरा-श्याखाली होता, अशी माहिती सध्या मिळत आहे. त्याची अवस्था पाहून त्याच्या कुटुंबाने मुंबईतील दादर इथल्या मा-नसोपचार तज्ज्ञांकडे उपचार सुरु केले होते.
उपचाराला चांगला प्रतिसादही मिळत होता. पण अचानक त्याने इतक्या टोकाचे पाऊल उचलल्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून आशुतोष आणि मयुरी नांदेड शहरातील घरी राहत होते. आशुतोष आणि मयुरी यांचा 4 वर्षांपूर्वी विवाह झाला होता.
आशुतोषने अभिनेता भारत जाधवसोबत ‘इच्चार करा पक्का’ या मराठी चित्रपटात सहकलाकाराची भूमिका केली होती. त्यानंतर त्याने भाकरी या मराठी चित्रपटात नायकाची भूमिका केली होती. आशुतोषच्या मागे आई-वडील, पत्नी आणि सध्या परदेशात शिकत असलेला 1 लहान भाऊ असा परिवार आहे.