‘राम तेरी गंगा मैली’ मधल्या अभिनेत्रीला ओळखणं झालंय कठीण, दाऊद सोबत नाव जोडल्यामुळे आयुष्याचे लागले होते लव…

‘राम तेरी गंगा मैली’ मधल्या अभिनेत्रीला ओळखणं झालंय कठीण, दाऊद सोबत नाव जोडल्यामुळे आयुष्याचे लागले होते लव…

८० च्या दशकातील अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या आता इंडस्ट्रीतून गायब आहेत. या अभिनेत्रींपैकी एक नायिकेचे नाव आहे ‘मंदाकिनी’. ‘राम तेरी गंगा मैली’ (Ram Teri Ganga Maili) या चित्रपटातून मंदाकिनी  (Mandakini) प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर तुफान चालला आणि त्यामुळेच मंदाकिनी प्रकाशझोतात आली होती.

पण तिच्या या प्रसिद्धी ला नजर लागली ती अंडरवर्ल्ड ची. आणि ती दाऊद च्या नजरेत आली. तिचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसोबत जोडले गेल्याने अभिनेत्रीचे आयुष्य इतके उद्ध्वस्त झाले होते की, तिला आता सिनेविश्वापासून दूर जावे लागले. तरीही मंदाकिनी आजही अनेक सिनेरसिकांच्या स्मरणात कायम आहे ती तिच्या सुंदर चेहऱ्यामुळे.

काळानुसार मंदाकिनीचा लूक खूप बदलला आहे. आता तिला ओळखणं कठीण झालं आहे. मंदाकिनीने १९८५ साली ‘मेरा साथी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अभिनेत्री खरं नाव आहे यास्मिन जोसेफ. तिला खरी ओळख मिळाली ती राज कपूर यांच्या ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून. या चित्रपटात तिने दिलेल्या बोल्ड सीनची आजही चर्चा होते.

‘राम तेरी गंगा मैली’ नंतर मंदाकिनी अनेक चित्रपटांमध्ये दिसली. पण तिला या चित्रपटातून इतकी प्रसिद्धी मिळाली नाही. मंदाकिनीच्या चित्रपटांमध्ये ‘आग और शोला’, ‘अपने अपने’, ‘प्यार करके देखो’, ‘हवालत’, ‘नया कानून’ आणि ‘दुश्मन’ यांचा समावेश आहे. या सर्व चित्रपटातील अभिनयापेक्षा मंदाकिनीचे सौंदर्य लोकांना जास्त आवडले.

मंदाकिनीला १९९४-९५ साली दुबईतील शारजाहमध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यादरम्यान अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सोबत पाहिले होते. सूत्रांनुसार दाऊद इब्राहिमने मंदाकिनीला आपल्या अड्ड्यावर बोलवून घेतलं होतं. दोघांचे फोटो व कित्येक कथा चर्चेत आल्या होत्या. मात्र मंदाकिनी हिने नेहमीच या वृत्ताना दुजोरा दिला नाही.

मंदाकिनीने बौद्ध भिक्षू डॉ. कग्युर टी. रिनपोचे ठाकूर यांच्याशी लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यानंतर मंदाकिनी ६ वर्षांनंतर चित्रपटांमधून गायब झाली. आज मंदाकिनी एक सामान्य आयुष्य जगत आहे आणि बॉलिवूड च्या चंदेरी दुनियेपासून खूप दूर आहे.

admin