रस्त्यावर भाजी घेतांना दिसली ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, तरीही कोणीही नाही ओळखले, ना भाजीवाला ना फॅन्सनी काढला सेल्फी

रस्त्यावर भाजी घेतांना दिसली ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, तरीही कोणीही नाही ओळखले, ना भाजीवाला ना फॅन्सनी काढला सेल्फी

सेलिब्रिटींसह फोटा काढावा, त्यांच्यासह सेल्फी असावा,ऑटोग्राफ घ्यावा किंवा मग एक झलक तरी पाहायला मिळावी अशी फॅन्सची इच्छा असते. मात्र सध्या सोशल मीडियावर एक असा फोटो व्हायरल झाला आहे ज्यात एक अभिनेत्री मुंबईच्या रस्त्यावर फिरते आहे. मात्र तिला कुणीच ओळखलं नाही. अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून ती आहे बॉलिवूडची मुन्नी मलायका अरोरा. हिचा हा फोटो आहे.

फोटोत मुंबईच्या रस्त्यावर भाज्या -फळं खरेदी करताना दिसत आहे. मलायका एकटीच इथे भाजीविक्रेत्यांशी मोलभाव करताना या फोटोत पाहायला मिळत आहे. यावेळी जेव्हा फोटोग्राफर मलायकाच्या जवळ पोहोचले तेव्हाभाजी खरेदी करण्यात तिला कसलाही कमीपणा वाटला नाही. विशेष बाब म्हणजे, सिनेमांमधून लोकप्रिय झालेल्या मलायकासोबत ना भाजीवाला आणि ना सामान्य माणसाने सेल्फी काढला.

मलायकाच्या व्हिडीओला शेअर होताच मिळाले ४५ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले. मलायका अरोरा डान्ससोबतच तिच्या लूक्समुळेही चर्चेत राहते. नुकतंच तिने केलेलं बोल्ड फोटोशूटही व्हायरल झालं होतं. काही दिवसांपूर्वी मलायका अरोरा कोरोना पॉझिटिव्ह निघाली होती. त्यामुळे ती इंडियाज बेस्ट डान्सर शोमधून काही दिवस गायब होती. त्यानंतर कोरोनाला मात देऊन ती परत शोमध्ये आली.

सध्या ती फिटनेसवर अधिक भर देत आहे.तिचा एक व्हिडीओ ‘बॉलिवूड बींज’ ने त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. मलायका अरोराने या व्हिडीओत ब्लू कलरचा आउटफिच घातला आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर तिचे फॅन्स भरभरून कमेंट करत आहेत. तिच्या या व्हिडीओला ४५ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिमेता अर्जुन कपूर यांच्या अफेयरच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत.

दोघांचं एकत्र दिसणं, फिरणं यांत काही नवं राहिलं नाही. लवकरच हे दोघं लग्न करणार असल्याची चर्चा आहे. मात्र या अफेयरबाबत मलायकाने पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. पहिल्यांदाच तिने अर्जुनसोबतच्या रिलेशनबाबत विविध खुलासे केले आहेत.

दोघंही एप्रिल महिन्यात रेशीमगाठीत अडकणार अशी चर्चा होती. मात्र या चर्चा केवळ माध्यमांमध्येच सुरू असल्याचे तिने स्पष्ट केले आहे. यावरून दोघंही लग्न करणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. यासोबतच अरबाजसोबतचं नातं संपवायचं नव्हतं असंही तिने सांगितले.

“प्रत्येकाला जीवनात जोडीदार, नातं हवं असतं. त्यावेळी अरबाजसह काडीमोड घेऊ नये” असं अनेकांनी सुचवलं होतं असंही मलायकाने सांगितलं. मात्र काडीमोड घेण्याचा आपला निर्णय झाला होता आणि या निर्णयामुळे खूश आहे असंही तिने म्हटलं आहे.

admin