जाणून घ्या नेमकं त्यादिवशी काय घडलं होते ज्यामुळे विनोद खन्ना ने मुकेश भट्टच्या कानशिलात लगावली होती, जाणून घ्या सर्व किस्सा

जाणून घ्या नेमकं त्यादिवशी काय घडलं होते ज्यामुळे विनोद खन्ना ने मुकेश भट्टच्या कानशिलात लगावली होती, जाणून घ्या सर्व किस्सा

बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते विनोद खन्ना यांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले. त्यांना दुर्धर अशा आजारांनी ग्रासले होते. शेवटच्या काळामध्ये ते ओळखू सुद्धा येत नव्हते, अशी त्यांची अवस्था झाली होती. विनोद खन्ना म्हणजे बॉलिवूडचा अतिशय चार्मिंग असे स्टार. अतिशय हँडसम असा अभिनेता अशी त्यांची ख्याती होती.

सत्तर आणि ऐंशीच्या दशकामध्ये ज्यावेळी अमिताभ बच्चन हे भारात होते, त्यावेळी विनोद खन्ना हा देखील आपल्या अभिनयाने सर्वांना भारावून टाकत होते. विनोद खन्ना यांनी अनेक हिट चित्रपट बॉलीवूड दिलेले आहेत. त्यांनी काम केलेले सर्व चित्रपट हिट झालेले आहेत. विनोद खन्ना यांना अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना ही मुले आहेत. यातील अक्षय खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये चांगली असे काम केले आहे.

राहुल खन्ना यांनी हॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे. एक काळ असा होता की, अमिताभ बच्चन यांना टक्कर देईल, असा अभिनेता बॉलिवूडमध्ये केवळ विनोद खन्ना हेच होते. तेव्हा सांगण्यात येते की, अमिताभ बच्चन यांना देखील विनोद खन्ना हे मागे सोडतील. मात्र, असे काही झाले नाही. विनोद खन्ना यांची दयावान या चित्रपटातील भूमिका ही खूप गाजली होती. यातील त्यांचा माधुरी दीक्षिततीच्या सोबतचा हॉट सीन खूप गाजला होता.

त्यावेळी माधुरी दीक्षितची खूपच चर्चा झाली होती. मात्र, त्यानंतर माधुरी हिने आपण असा चित्रपट पुन्हा कधी करणार नाही, असे सांगितले होते. विनोद खन्ना यांचे जीवन अतिशय रंजक असे होते. त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक चढ-उतार पाहिले होते. काही काळ ते ओशो आश्रम मध्ये देखील राहिले होते. आपल्याला आम्ही विनोद खन्ना यांच्या बाबत एक असाच एक किस्सा सांगणार आहोत.

विनोद खन्ना यांनी महेश भट यांचा भाऊ मुकेश याला कानशिलात लगावली होती. याचे कारण देखील असेच होते. चला तर मग जाणून घेऊया नेमके काय कारण होते. त्यावेळी विनोद खन्ना हे अतिशय बहारात होते. महेश भट बॉलीवूडमध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी आले होते. मात्र, त्यांच्याकडे एवढे काम नव्हते. त्यामुळे त्यांनी आपला भाऊ मुकेश याला विनोद खन्ना यांचा स्वीय सहाय्यक केले होते.

त्यावेळी महेश भट अतिशय वाईट परिस्थितीतून जात होते. त्यामुळे महेश भट यांचा पूर्ण खर्च विनोद खन्नाचा करत होते. एका इंटरव्यू मध्ये महेश भट यांनी याबाबत माहिती सांगितली होती की, विनोद खन्ना माझा सर्व खर्च करतात आणि मला बाहेर फिरण्यासाठी देखील पैसे देतात. त्यावेळी विनोद खन्ना यांच्या आईचा मृत्यू झाला. त्यावेळी विनोद खन्ना हे अतिशय अस्वस्थ झाले होते. त्यावेळी महेश भट यांनी विनोद खन्ना यांना ओशो आश्रमात जाण्याचा सल्ला दिला होता.

त्यानंतर विनोद खन्ना आणि महेश भट अनेकदा ओशो आश्रमात जात होते. काही दिवसानंतर महेश भट यांचे दिवस पालटले आणि ते चित्रपट सृष्टी मध्ये काम करू लागले. त्यावेळी इन्साफ हा चित्रपट सुरू होता. या चित्रपटाचा प्रोडूसर मुकेश भट्ट यांना केले होते. या चित्रपटाचा सेटवरच महेश भट्ट, मुकेश आणि विनोद खन्ना यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले.

त्यानंतर या चित्रपटाचे चित्रीकरण जवळपास चाळीस दिवस रखडले होते. महेश भट आणि मुकेश विनोद खन्ना यांना त्यांचे ठरलेले पैसे देत नव्हते. त्यामुळे विनोद खन्ना हे चांगलेच रागावले होते. त्यामुळे त्यांनी सेटवरच मुकेश यांना सुनावले होते. त्यानंतर मुकेश यांनी प्रसारमाध्यमांना विनोद खन्ना यांच्या बाबत काही वाईट माहिती दिली होती.

त्यामुळे विनोद खन्ना हे चांगले चिडले होते. त्यानंतर विनोद खन्ना यांनी मुकेश भट कानशिलात लगावली होती. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले होते. त्यानंतर या त्रिकुटाचे संबंध कायमचे खराब झाले होते.

admin