साऊथचा ‘हा’प्रसिद्ध अभिनेता आहे महाराष्ट्राचा जावईबापू, नाव जाणून आश्चर्य वाटेल

साऊथचा ‘हा’प्रसिद्ध अभिनेता आहे महाराष्ट्राचा जावईबापू, नाव जाणून आश्चर्य वाटेल

महेश बाबू हे तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रचंड गाजलेलं नाव आहे. आजही त्याचे चित्रपट प्रचंड यशस्वी होतात. महेश बाबू आणि महाराष्ट्राचं अनोखं नातं आहे. महेश बाबू हा महाराष्ट्राचा जावई असल्याचे फार कमी जणांना माहिती आहे. त्याने त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या अभिनेत्रीशी लग्न केलं असल्याची माहितीही फार कमी जणांना आहे.

9ऑगस्ट रोजी महेश बाबूचा वाढदिवस होता. 45 वर्षांच्या महेश बाबूने बालकलाकार म्हणून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरूवात केली होती. 1999 साली त्याचा राजा कुमारूडू नावाचा पहिला चित्रपट अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाला होता.

तमिळनाडूमध्ये जन्मलेल्या महेश बाबूची प्रेमकहाणी ही देखील चित्रपटांमध्ये शोभेल अशीच आहे. त्याचं बॉलीवूडमधल्या देखण्या अभिनेत्रीवर प्रेम जडलं होतं आणि बघता बघता ती देखील त्याच्या प्रेमात पडली होती. या दोघांनी 15 वर्षांपूर्वी लग्न केलं आणि या दोघांकडे आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं.

शिल्पा शिरोडकरची बहीण असलेली नम्रता शिरोडकर ही हिंदी चित्रपटांप्रमाणेच तेलुगू चित्रपटांमध्येही काम करत होती. चित्रपटात येण्यापूर्वी तिने मॉडेलिंग क्षेत्रात नाव कमावलं होतं. 2000 साली प्रसिद्ध झालेल्या वामसी चित्रपटामध्ये नम्रता आणि महेश हे दोघे एकत्र आले होते. बघता क्षणीच महेश नम्रताच्या प्रेमात पडला होता.

नम्रतालाही महेश आवडला होता आणि काही दिवसांमध्ये त्यांच्यातील मैत्री प्रेमात बदलली होती. 5 वर्ष हे दोघे एकमेकांसोबत होते, मात्र त्याची कुणकुण कोणालाही लागली नाही. महेशने त्याच्या प्रेमाबद्दल सगळ्यात आधी त्याच्या बहिणीला सांगितलं होतं. नम्रता ही महेशपेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे.

लग्नानंतर आपण चित्रपटात काम करणार नाही असं नम्रताने आधीच जाहीर केलं होतं. त्यानुसार तिने लग्नापूर्वी तिच्या सगळ्या असाईनमेंट पूर्ण केल्या आणि लग्नानंतर चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला नम्रता आणि महेशला एक मुलगा आणि एक मुलगी असून नम्रता तिच्या कुटुंबात पूर्णपणे रमली आहे.

admin