‘तारक मेहता..’मधल्या ‘माधवी भाभी’ने शेअर केला रिअल लाइफ पतीचा फोटो

‘तारक मेहता..’मधल्या ‘माधवी भाभी’ने शेअर केला रिअल लाइफ पतीचा फोटो

छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. या मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांचं मन जिंकलं असून त्यातील कलाकारसुद्धा लोकप्रिय आहेत. या मालिकेत गेल्या बारा वर्षांपासून काम करणारी अभिनेत्री सोनालिका जोशी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते.

सोनालिका मालिकेत गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम भिडे यांच्या पत्नीची म्हणजेच माधवी भाभीची भूमिका साकारतेय. सोनालिकाने नुकतंच खऱ्या आयुष्यातील पतीसोबतचा खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

तिने हा फोटो पोस्ट करण्यामागचं कारण म्हणजे सोनालिका व तिचा पती समीर यांच्या लग्नाचा एकोणीसावा वाढदिवस. या खास दिनानिमित्त सोनालिकाने लग्नाचा फोटो पोस्ट केला आहे. ‘१९ वर्षे एकत्र राहिलो.. माझ्या चेहऱ्यावर झळकणाऱ्या हास्याचं कारण ते आहेत. एकमेकांना ओळखण्यासाठी, एकत्र मिळून आठवणी बनवण्यासाठी आणखी एक वर्ष आमच्यासमोर आहे.

देवाचा आशिर्वाद आम्हा दोघांवर असू दे’, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.’तारक मेहता..’च्या पहिल्या भागापासून सोनालिका जोशी या मालिकेत माधवी भाभीचे पात्र साकारत आहे. मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्याबरोबर तिचं चांगलं मैत्रीचं नातं आहे. मालिकेसाठी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत सोनालिकाचंही नाव आहे.

सोनालिकाचा जन्म ५ जून १९७६ रोजी महाराष्ट्रात झाला. मराठी नाटकांपासून सोनालिकाने तिच्या करिअरची सुरुवात केली. याशिवाय सोनालिकाने मराठी चित्रपट आणि काही जाहिरातींमध्येही काम केलं आहे.

admin