‘या’अभिनेत्रीचा आरोप – “कतरीनाने माझं करिअर बरबाद केलं.. सलमानने मला एकदाच घेतलं पण तिला मात्र नेहमीच..

‘या’अभिनेत्रीचा आरोप – “कतरीनाने माझं करिअर बरबाद केलं.. सलमानने मला एकदाच घेतलं पण तिला मात्र नेहमीच..

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि दबंग खान सलमानने बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटामध्ये काम केले आहे. सध्या तो सर्वांचा आवडता अभिनेता आहे. त्याची फॅन फॉलोव्हिंगही खूप प्रमाणात वाढत आहे. सलमान बॉलिवूड क्षेत्रामध्ये खूप वर्षांपासून कार्यरत आहे. त्याने अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आहे.

सलमान खानची आणखी एक खासियत म्हणजे सलमान नेहमी नवीन अभिनेत्रींना चित्रपटामध्ये घेऊन येत असतो. बॉलिवूडच्या प्रत्येक अभिनेत्रीस सलमान खानबरोबर चित्रपटामध्ये काम करण्याची इच्छा असते. पण सगळ्याच अभिनेत्र्यांची ईच्छा पूर्ण होतेच असे नाही. काही अजूनही त्यांच्या संधीच्या प्रतीक्षेत आहेत.

सलमान खानने चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्रीना लॉन्च केलं आहे. त्यापैकी काही हिट ठरल्या, तर काही साइड रोल्स करून लाइम लाइटपासून दूर गेल्या. झरीन खानला देखील चित्रपटसृष्टीत सलमान खानने आणले होते. झरीन खानने ‘वीर’ चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पर्दापण केले यानंतर ती ‘रेडी’, ‘हाऊसफुल’ आणि ‘हेट स्टोरी 3’ सारख्या बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसली.

मात्र, अशा हिट चित्रपटांमध्ये काम करूनही झरीन खान चित्रपटसृष्टीतल्या एका गोष्टीमुळे खूप चिडते कारण झरीन खानची तुलना नेहमीच अभिनेत्री कतरिना कैफसोबत केली जाते. कारण ही तसेच आहे. जरीन खान ही दिसायला अगदी हुबेहूब कतरीना सारखीच आहे.

झरीन खानला तिची तुलना कतरिना कैफसोबत केलेले मुळीच आवडत नाही. तिचे म्हणणे आहे की, कोणत्याही चित्रपट निर्मात्याला तिच्याबरोबर काम करण्याची इच्छा नाही होत, झरीन कतरिनासारखी दिसते आणि एकसारखीच दिसणाऱ्या अभिनेत्रीला निर्माते कास्ट करू इच्छित नाहीत.

झरीन खानने याचा खुलासा एनबीटीला दिलेल्या मुलाखतीत केला. झरीन म्हणाली अगोदर लोक मला म्हणायचे की, मी माझ्या आई सारखी दिसते मात्र, मी चित्रपटसृष्टीत आल्यानंतर मला कळल की मी कतरिना कैफसारखी दिसते.

मला कतरिना कैफसारखे दिसण्याचा खूप मोठा फटका बसला आणि बसत देखील आहे. कतरिनामुळे माझं करियर खराब झालं, झरीना म्हणते की, गेली 11 वर्षे चित्रपटसृष्टीत मी कतरिना सारखी दिसते असे म्हणले जाते याचा परिणाम माझ्या कारकिर्दीवर झाला आहे.

विकी काैशल आणि कतरिना कैफचे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, या दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कोणतेही भाष्य केले नाही. दोघेही पार्टी आणि प्रोग्राममध्येसोबत असतात एवढेच नव्हे तर या दोघांनीसोबतच नवीन वर्ष देखील साजरे केले, ज्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते

admin