रात्री अपरात्री लपून छपून सलमान च्या गर्लफ्रेंड च्या रूम मध्ये दिसला हा अभिनेता.. सलमान ला समजताच..

रात्री अपरात्री लपून छपून सलमान च्या गर्लफ्रेंड च्या रूम मध्ये दिसला हा अभिनेता.. सलमान ला समजताच..

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्यात काहीतरी खिचडी शिजतेय. हे आम्ही नाही तर गेल्या काही महिन्यांपासून येत असलेल्या बातम्या म्हणताहेत. सध्या कतरीना कैफ आणि विकी कौशलच्या डेटींगच्या बातम्यांना जोर चढला आहे.

गतवर्षी दिवाळी पार्टीत कॅट आणि विकी पहिल्यांदा कॅमे-यांत कैद झाले आणि दोघांच्या अफेअरची चर्चा सुरु झाली. आता पुन्हा एकदा विकी व कतरीना यांच्या अफेअरची चर्चा जोरात आहे. कारण काय तर शनिवारी रात्री विकी कॅटच्या घरी पोहोचला. तो सुद्धा लपत-छपत. पण तरीही बोभाटा झालाच.

होय, शनिवारी रात्री उशिरा विकी कतरिना राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये पोहोचला. लोकांच्या नजरेत येऊ नये यासाठी त्याने अनेक प्रयत्न केलेत. पण पापाराझींच्या कॅमे-यांपासून तो लपू शकला नाही. याचे फोटोही व्हायरल झालेत.

गतवर्षी अंबानीच्या दिवाळी पार्टीत कतरीना व विकी एकत्र दिसले होते. पार्टी संपल्यानंतर दोघेही एकत्र बाहेर पडले होते. पण बाहेर मीडियाला पाहताच दोघांनीही मार्ग बदलला होता. पापाराझींना बघताच कतरीना अक्षरश: भींतीआड लपली होती.

दुसरीकडे ‘तो मी नव्हेच’ अशा थाटात विकी कतरीनाला इग्नोर करून एकटा कारमध्ये बसून निघून गेला होता . हा सगळा सीन कॅमे-यात कैद झाला होता. ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यानही दोघांचे वागणे बघून यांच्यात काहीतरी शिजतेय, अशी चर्चा सुरु झाली होती.

कतरीना आणि विकी शेवटच्या रांगेत एकत्रच चित्रपट पाहायला बसले होते. चित्रपट संपल्यावर विकी आणि कतरिना थिएटरच्या दारापर्यंत एकत्र चालत आले परंतु, बाहेर उभ्या असलेल्या फोटोग्राफर्सना पाहून मात्र त्यांनी आपला मार्ग बदलला होता.

‘कॉफी विद करण’ या शोमध्ये विकीने कतरिनाला डेट करत असल्याच्या बातम्या नाकारल्या होत्या. कतरिना मला आवडते. पण या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही, असे तो म्हणाला होता.

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल कतरिनाआधी हरलीन सेठी या मॉडेलच्या प्रेमात होता. एका मुलाखती दरम्यान विकीने इशारो-इशारोमध्ये लेडी लव्ह हरलीन सेठीवरील प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर काहीच दिवसांनी दोघांचे ब्रेकअप झाल्याची बातमी आली होती.

रिपोर्टनुसार, कतरिना कैफसोबत विकीच्या वाढत्या जवळीकीमुळे हरलीन दुखावली आणि तिने विकीसोबत ब्रेकअप केले. तेव्हापासून कॅट व विकी यांच्या आॅफस्क्रिन रोमान्सच्या चर्चा सुरु झाल्या.

कतरिनाचे म्हणाल तर सर्वप्रथम सलमान खानसोबत तिचे नाव जोडले गेले. यानंतर तिच्या आयुष्यात रणबीर कपूरची एन्ट्री झाली होती. मात्र कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले. आता सलमान ला कतरीना आणि विकी कौशलचं हे प्रकरण समजल्यावर त्याची काय प्रतिक्रिया असेल हे बघण्यासारखं असेल.

admin