दुसऱ्या मुलाचं नाव नुकतंच ठेवलं आणि करिना कपूर तिसऱ्यांदा होणार आई? ‘तो’ फोटो पाहून चाहतेही हैराण..

दुसऱ्या मुलाचं नाव नुकतंच ठेवलं आणि करिना कपूर तिसऱ्यांदा होणार आई? ‘तो’ फोटो पाहून चाहतेही हैराण..

बॉलिवूडची बेबो अर्थात करिना कपूर हिने वीकेंडला अशी काही पोस्ट केली की ते पाहून चाहते हैराण झालेत. होय, करिना तिसऱ्यांदा प्रेग्नंट तर नाही ना? असा प्रश्न ही पोस्ट पाहून चाहत्यांना पडला.

गेल्या 21 फेब्रुवारी रोजी करिनाने दुस-या बाळाला जन्म दिला. अशात आज बेबोने काय तर सोनोग्राफी फिल्मचा एक फोटो शेअर केला. करिनाच्या हातात सोनोग्राफी फिल्म स्पष्ट दिसतेय.

पण ही कोणाच्या सोनोग्राफीची फिल्म आहे, हे तिने सांगितले नाही. ‘एका एक्सायटिंग गोष्टीवर काम करत आहे. पण तुम्ही विचार करताय ती ही गोष्ट नाही…,’ केवळ इतकेच तिने या पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिले.

करिनाची ही पोस्ट पाहून अनेक युजर्सनी तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. करीना तू पुन्हा प्रेग्नंट तर नाही ना? असा प्रश्न अनेकांनी तिला विचारला. गूड न्यूज 2.0, असे एका युजरने लिहिले. एकाने तर चक्क बस करो अब, अशी मजेशीर कमेंट केली.

अभिनेत्री करीना कपूरने 21 फेब्रुवारी, 2021 रोजी दुस-या मुलाला जन्म दिला होता. खान आणि कपूर कुटुंबाने पहिल्या दिवसांपासून या छोट्या नवाबाच्या नावाबाबत मौन बाळगले आहे. बॉम्बे टाइम्सच्या रिपोर्टनुसार, सैफ अली खान आपल्या छोट्या मुलाला ‘जेह’ या नावाने संबोधतात.

अर्थात हे बाळाचे निकनेम असून अद्याप बाळाचे नामकरण झालेच नसल्याचे म्हटले जातेय. रिपोर्टनुसार, या छोट्या नवाबाचे नाव सैफचे वडील मंसूर अली खान पतौडी यांच्या नावावर मंसूर ठेवण्याचाही सध्या विचार सुरू आहे.

2016 मध्ये करिनाने पहिल्या मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव तैमूर ठेवल्याचे तिने जाहिर करताच, अनेकांनी या नावावर आक्षेप घेतला होता. यावरून करिना व सैफ दोघेही प्रचंड ट्रोल झाले होते.

हे आहे कारण करिनाने सोनोग्राफीचा फोटो का शेअर केला, हा प्रश्न अद्यापही तुम्हाला पडला असेल तर याचे कारण आहे तिचे लवकरच प्रकाशित होऊ घातलेले पुस्तक़ होय, बेबोने प्रेग्नंसीवर एक पुस्तक लिहिले आहे. तिच्या दोन्ही गरोदरपणातील अनुभवांवर आधारित हे पुस्तक आहे. खास गरोदर मातांसाठी हे पुस्तक असल्याचे तिने म्हटले आहे.

admin