करीनाने अनेकदा धुडकावून लावले होते सैफचे प्रपोजल.. शेवटी त्याची ‘ही’ गोष्ट बघून झाली कबूल..

करीनाने अनेकदा धुडकावून लावले होते सैफचे प्रपोजल.. शेवटी त्याची ‘ही’ गोष्ट बघून झाली कबूल..

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान भलेही आता सैफ अली खानसोबत आनंदी विवाहित जीवन व्यतित करते आहे. मात्र अशी एक वेळ होती जेव्हा सैफच्या लग्नाचे प्रपोजल एकदा नाही तर चक्क दोनदा करीनाने नाकारले होते.

याबद्दल करीना कपूरने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिने सैफ अली खानचे लग्नाचे प्रपोजल दोनदा नाकारले होते. चित्रपट टशनच्या शूटिंगदरम्यान सैफने पहिल्यांदा तिच्याकडे लग्नाबद्दल उल्लेख केला होता तेव्हा ते ग्रीसमध्ये शूटिंग करत होते.

करीना म्हणाली की, सैफ मला म्हणायचा की आपल्याला लग्न केले पाहिजे. त्याने ग्रीस व्यतिरिक्त लडाखमध्येदेखील हीच गोष्ट सांगितली तेव्हा मी म्हटले की मी तुम्हाला ओळखत नाही. खरेतर मला त्यांना आणखीन चांगल्यारितीने जाणून घ्यायचे होते.

काही कालावधीनंतर करीना कपूरने सैफ अली खानला लग्नासाठी होकार दिला आणि त्यांनी २०१२ साली लग्न केले. करीनाने सैफला लग्नाच्या निर्णयाबद्दल सांगितले होते की, मला वाटते की मी जीवनातील योग्य निर्णय घेतला होता.

मी सैफला हेही म्हटलं होते की, मी कधी काम करणे थांबवणार नाही त्यावर सैफ म्हणाला होता की, तू नेहमी काम करू शकते. करीना सैफची दुसरी पत्नी बनली. त्यामुळेच तिला लग्नाआधी बरेच सल्ले देण्यात आले होते.

लोकांनी करीनाला म्हटले होते की, सैफ घटस्फोटीत आहे. दोन मुलांचा वडील आहे. तुझे करिअर बर्बाद होईल. असे बरेच काही सांगितले होते. पण करीना आपल्या निर्णयावर ठाम राहिली. आता सैफ आणि करीना दोन मुलांचे पालक आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर नेहमी आपल्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असते. तिन सैफ अली खानसोबतच्या रिलेशनशीपबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. एका मुलाखतीत तिला विचारले होते की, सैफसोबत लग्न केल्यानंतर त्यांनी ऑन स्क्रीन पॉलिसी ठरवली नाही का कारण सैफ लग्नानंतर काही सिनेमात इतर अभिनेत्रींसोबत किसिंग सीन करताना दिसला होता.

करीना कपूरने या प्रश्नांचे उत्तर बेधडकपणे देताना सांगितले होते की, आम्ही ऑफस्क्रीन नो किसिंग पॉलिसी स्वीकारली आहे. सैफ ऑन स्क्रीन कोणालाही किस करू दे, मला काहीच प्रॉब्लेम नाही कारण ज्यापद्धतीने चित्रपट बनत आहेत, ते आमच्या कामाचा हिस्सा आहे.

करीनाने पुढे याबद्दल सांगितले की, मी की अँड कामध्ये अर्जुन कपूरसोबत किसिंग सीन दिले होते कारण हा चित्रपट पती पत्नीच्या नात्यावर होता आणि मी किसिंग सीन करायला नकार देणे योग्य ठरले नसते. करीना म्हणाली की, लग्नानंतर मी आणि सैफ सिनेमात नो किसिंग पॉलिसीचा अवलंब करणार होतो पण साराने आमचा विचार बदलायला लावला.

admin