`माझ्यासाठी साईज…`, पुरूषांबद्दल विचारलेल्या खाजगी प्रश्नाचं Kareena नं दिलं उत्तर, पाहा Video

`माझ्यासाठी साईज…`, पुरूषांबद्दल विचारलेल्या खाजगी प्रश्नाचं Kareena नं दिलं उत्तर, पाहा Video

करीना कपूर सध्या आपल्या नव्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त झालेली पाहायला मिळते आहे. ‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशानंतर करीना फारशी प्रकाशझोतात दिसत नव्हती आता पुन्हा एकदा करीनानं आपल्या नव्या चित्रपटांसाठी कंबर कसलेली दिसते. तिनं नुकताच लंडन दौरा केला होता. काही दिवसांपुर्वीही ती लंडनमध्ये असल्याचं बोललं गेलं होतं. आता करीनाचा नवा व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये करीना आपल्या घरात बसून नव्या स्टाईलिश चपला खरेदी करताना दिसते आहे.

परंतु जेव्हा जेव्हा स्पष्ट आणि उघडपणे बोलण्याचा मुद्दा येतो तेव्हा आपण करीना कपूरचं नावं हे घेतोच घेतो. प्रत्येक वेळी तिनं आपली मतं निर्भयपणे बोलून दाखवली आहेत आणि त्यामुळे तिला अनेकदा ट्रोलही करण्यात आलं आहे. (Kareena Kapoor Trolled)

सध्या असाच तिचा एक व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होतो आहे. करीना कपूरचा ‘एक मैं हू और एक तू’ (Ek Mein Hu Aur Ek Tu) हा चित्रपट रिलिज झाला होतो तेव्हा या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी करन जोहरच्या शोमध्ये तिनं हजेरी लावली होती. (Karan Johar Show) या शोमध्ये कायमच कॉन्ट्रोव्हर्शियल प्रश्न विचारले जातात. त्याचप्रमाणे करीनालाही करणनं असाच एक प्रायव्हेट प्रश्न विचारला होता..

ज्याचं उत्तर ऐकून तिच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. करण जोहर आणि करीना कपूर हे खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या बाँडिंगची संपूर्ण बॉलीवूडमध्ये चर्चा आहे. ती जेव्हाही करण जोहरच्या शोमध्ये येते तेव्हा ती नेहमीच खळबळ माजवून देते असे तिचे चाहतेही म्हणतात.

करण जोहरचा टॉक शो ‘कॉफी विथ करण’ (Coffee With Karan) हा मनोरंजन विश्वातील सर्वात वादग्रस्त टॉक शो मानला जातो. या शोमधून अशा अनेक वादग्रस्त गोष्टी समोर आल्या आहेत, ज्याने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती आणि त्यापैकीच एक करीनाची मुलाखत आहे, जेव्हा ती पुरुषांच्या ‘त्या’ प्रायव्हेट प्रश्नावर बोलली होती.

ती एकदा ‘कॉफी विथ करण’मध्ये अभिनेता इम्रान खानसोबत (Actor Imran Khan) आली होती आणि यादरम्यान करणने अनेक वादग्रस्त प्रश्न विचारले होते. रॅपिड फायर राउंड दरम्यान करणने करीनाला अनेक प्रश्न विचारले पण करीनाने त्यांची उत्तरे देण्यास नकार दिला होता. मात्र करणच्या विनंतीवर तिने हा खेळ खेळण्यास होकार दिला.

करण जोहरने करीना कपूरला विचारले की साईजबद्दल तुला काय वाटतं, त्यानं तुला काही फरक पडतो? यावर करीना थोडा वेळ शांत झाली. त्याचवेळी इम्रान खान म्हणाला की, मला याचे उत्तर ऐकायचे आहे. संपुर्ण पुरूषांच्या वतीनं तू बोल, असं तो म्हणाला. थोडा विचार केल्यानंतर करिनाने उत्तर दिलं की माझ्यासाठी साईज महत्त्वाची आहे. त्यावेळी या उत्तरानं खूप खळबळ माजवून दिली होती.

admin