या कारणामुळे करीना कपूरने अजय देवगनला किस करण्यास दिला होता नकार, वाचून चकित व्हाल…

या कारणामुळे करीना कपूरने अजय देवगनला किस करण्यास दिला होता नकार, वाचून चकित व्हाल…

अजय देवगन हा बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता. अजय देवगन याने आजवर अनेक चित्रपट केले. त्याने काम केले जवळपास सगळेच चित्रपट हे हिट झालेले आहेत. अजय देवगन याने जवळपास सगळ्याच अभिनेत्रींसोबत काम केलेले आहे.अजय देवगन याने ‘फुल और काटे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट त्यावेळेस प्रचंड चालला होता.

अजय देवगण हा विरू देवगण यांचा मुलगा आहे. त्यावेळेस या चित्रपटाने सगळे विक्रम मोडीत काढले होते. अजय देवगनची दोन बाईक वर पाय ठेवून येण्याची स्टाईल प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत मधू दिसली होती. त्यानंतर अजय देवगन याने मागे वळून पाहिलेच नाही.

एक एक चित्रपट त्याने केले. रोहित शेट्टी सोबत त्याने गोलमाल सीरिजमध्ये काम केलेले आहे. त्याची गोलमाल सिरीज ही प्रचंड चाललेली आहे. अजय देवगन याने सगळ्यात जास्त काम केलेली अभिनेत्री म्हणजे त्याची पत्नी काजोल ही म्हणावी लागेल. त्याचप्रमाणे त्याने करीना कपूर सोबत देखील अनेक चित्रपटात काम केले होते.

करीना कपूर सोबत अजय देवगण याने ओमकारा, गोलमाल, सिंघम रिटर्न्स, सत्याग्रह या सारख्या चित्रपटात काम केलेले आहे. यातील त्यांचा ओमकारा पिक्चर हा जबरदस्त असाच होता. या चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शन विशाल भारद्वाज यांनी केली होती. त्याचप्रमाणे गोलमाल सिरीस तर अजय देवगन चा लाडका आणि मित्र रोहित शेट्टी याने केलेली आहे. यामध्ये करीना कपूरची ही भूमिका होती.

अजय आणि करीना याचे खूप जुळत असल्याचे अनेकांना वाटते. त्यामुळेच अजय आणि करीना ही जोडी अनेक दिग्दर्शकांना हवी असते. मात्र, सगळ्यांनाच ही जोडी घेता येत नाही. करीना कपूर हिने रिफ्यूजी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले .हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. मात्र, यातील करीना कपूरचा अभिनय मात्र सगळ्यांना आवडला. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही.

तिने आपल्या करिअरमध्ये अनेक इंटीमेट सीन देखील केले. अजय देवगन सोबत तिने ओंकारा चित्रपटात इंटीमेट सीन केल्याचे पाहायला मिळाले. याचबरोबर शाहिद कपूर सोबत तिने जब वी मेट या चित्रपटामध्ये किसिंग सीन दिला. या सीन नंतर करीना कपूर आणि शाहिद कपूर याच्या प्रेमाची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर करिना कपूर हिने सैफ अली खान सोबत लग्न केले. मात्र, त्यानंतर तिने इंटीमेट सीन दिले नाहीत. 2013 मध्ये प्रकाश झा यांचा सत्याग्रह हा चित्रपट आला होता.

या चित्रपटात अजय देवगण आणि करीना कपूर यांची भूमिका होती. या चित्रपटातील एका गाण्या दरम्यान करीना कपूर आणि अजय देवगन यांच्यामध्ये किसिंग सीन प्रकाश झा यांना करायचा होता. मात्र, असा तीन करण्यास करिना कपूर हिने नकार दिला होता. याचे कारण जेव्हा तिला विचारले होते, त्यावेळेस तिने सांगितले की, माझे सैफ सोबत लग्न होणार आहे. त्यामुळे मी असा सीन आता करणार नाही. तिच्या या निर्णयाचे सर्वांनी स्वागत देखील केले होते.

admin