अजय देवगण ला काजोलची ही एक गोष्ट खूप खटकते, स्वतः अजय देवगणने केलाय धक्कादायक खुलासा..

अजय देवगण ला काजोलची ही एक गोष्ट खूप खटकते, स्वतः अजय देवगणने केलाय धक्कादायक खुलासा..

अजय देवगण व काजोल हे बॉलिवूडमधील एक लोकप्रिय कपल. काजोल व अजय गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये आहेत. दोघांच्या लग्नालाही 20 वर्षांपेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे. अर्थात तरीही दोघांच्या नात्यातील गोडवा जराही कमी झालेला नाही. खरे तर अजय व काजोल हे दोघेही परस्परांपेक्षा अगदी विरूद्ध.

अजय काहीसा लाजरा, कमी बोलणारा तर काजोल नुसती बडबडी. काजोल यापूर्वी अनेकदा अजयबद्दल, आपल्या पर्सनल लाईफबद्दल बोललीये. पण अजय फार क्वचित पर्सनल लाईफबद्दल बोलतो. पण आता अजयने एक असा खुलासा केलाय, जो वाचून तुम्हीही हैराण व्हाल. होय, काजोलमधील कोणती गोष्ट, तिचा कुठला गुण आवडत नाही, हे अजयने सांगितलेय.

तो म्हणाला, काजोल मर्यादेपेक्षा अधिक बोलते. तिच्या याच एका गोष्टीचा मला सर्वाधिक त्रा होता. चित्रपटाच्या सेटवर असो की घरी तिची नुसती बडबड सुरु असते. तुम्ही तिला कितीही शांत बसायला सांगा, पण ती बडबड केल्याशिवाय राहूच शकत नाही. अनेकदा मी तिला यासाठी टोकतो.

मात्र जेव्हा केव्हा ती शांत बसते, तेव्हा मलाच चुकल्यासारखे होते. ती शांत असलेली मला बघवत नाही. माझ्या मते, मला त्रास होत असला तरी काजोलने माझ्यासाठी कधीच बदलू नये. काजोल एक उत्तम अभिनेत्री आहे, सोबत तितकीच उत्तम पत्नीही. तिच्यासोबत काम करताना मी नेहमी खूश असतो, असेही त्याने सांगितले.

काजोल व अजय अलीकडे ‘तान्हाजी’ या सिनेमात एकत्र दिसले होते. या सिनेमात अजयने नरवीर तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारली होती तर काजलने त्यांच्या पत्नीची भूमिका निभावली होती. हा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला होता.

admin