कभी खुशी कभी गम या चित्रपटातील लड्डू आता दिसतो असा, ओळखणे देखील होतंय कठीण..

कभी खुशी कभी गम या चित्रपटातील लड्डू आता दिसतो असा, ओळखणे देखील होतंय कठीण..

कभी खुशी कभी गम या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावल्या होत्या. या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, काजोल, हृतिक रोशन, करिना कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या.

या चित्रपटात हृतिक रोशनच्या म्हणजेच रोहनच्या बालपणाच्या भूमिकेत एका बालकलाकाराला आपल्याला पाहायला मिळाले होते. या चित्रपटातील हा गोलमटोल लड्डू प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. या लड्डूची भूमिका कवीश मजुमदारने साकारली होती.

कवीश कभी खुशी कभी गम या चित्रपटाच्यावेळी शाळेत शिकत होता. पण आता तो चांगलाच मोठा झाला असून तो सध्या दुबईत राहातो असे म्हटले जाते. दुबईत होत असलेल्या बॉलिवूड इव्हेंटमध्ये त्याचा सहभाग असतो. कवीशला लड्डूची भूमिका कशी मिळाली होती याविषयी त्याने मसालाला दिलेल्या मुलाखतीविषयी सांगितले होते की, कभी खुशी कभी गमच्याआधी मी एका नाटकात काम केले होते.

तिथे कभी खुशी कभी गम साठी कॉर्डिनेशनचे काम करणाऱ्या व्यक्तीने मला पाहिले आणि कभी खुशी कभी गम या चित्रपटाच्या ऑडिशनविषयी सांगितले. माझे ऑडिशन करण जोहर यांनी घेतले होते. ऑडिशन झाल्यानंतर तीन महिन्यांनी या भूमिकेसाठी माझी निवड झाली. माझा पहिलाच शॉर्ट हा अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान यांच्यासोबत होता.

मी खूपच नर्व्हस होता. पण या सगळ्यांनी मला खूप सांभाळून घेतले. कवीशने कभी खुशी कभी गम प्रमाणेच काही शॉर्ट फिल्मसमध्ये देखील काम केले असून लक या चित्रपटासाठी त्याने साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.

admin