जॉन अब्राहम या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या प्रेमात होता वेडा..जाणून चकित व्हाल

जॉन अब्राहम या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या प्रेमात होता वेडा..जाणून चकित व्हाल

एक काळ असा होता की जॉन अब्राहम आणि बिपाशा बासु बॉलिवूडमध्ये खूप चर्चेत असलेला विषय होता. दोघेही एकमेकांच्या प्रेमामध्ये पडले होते. त्यामुळे सर्वांना वाटले होते ते दोघेही लग्न करतील. परंतु काही कारणामुळे बिपाशा आणि जॉनचे ९ वर्षे असलेले संबंध तुटले आणि ते वेगळे झाले.

त्यांच्या अचानकपणे वेगळे झाल्याने चाहत्यांनाही धक्का बसला. ते एकमेकांवर एवढे प्रेम करून त्या दोघांचे नातं इतकं बिघडण्याचं काय कारण होतं. असा प्रश्न आजही बर्‍याच लोकांना पडत आहे.

असे सुरू झाले जॉन आणि बिपाशाचे नाते: दोघांचा ब्रेकअप का झाले? हे माहित होण्यापूर्वी आपल्याला जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू यांच्यातील संबंध कसा सुरू झाला हे माहित असणे आवश्यक आहे. जॉन आणि बिपाशाने 2003 मध्ये आलेल्या जिस्म चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे जवळ येऊ लागले आणि दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले. आणि दोघामध्ये प्रेम झाले.

येथूनच त्यांच्या नवीन नात्याला सुरवात झाली होती. सुरुवातीला बिपाशा बसू अभिनेता राज डिनो मोर्याला डेट करत होती, नंतर तिने जॉन अब्राहमशी मैत्री केली तेव्हा तिने डिनो मोर्या सोबत संबंध तोडले. त्यावेळी जॉन आणि बिपाशाने बर्‍याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते आणि त्यातील बरेच चित्रपट हिट झाले होते.

हळू हळू दोघे हि एकमेकांच्या प्रेमात पडले आणि बॉलिवूडमध्ये त्यांच्या अफेयर विषयी बरीच चर्चा रंगली. हे दोघे 9 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते आणि बिपाशा बसू जॉनबरोबर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. त्यामध्ये जॉनने एक चूक केली आणि दोघांमधील संबंध संपुष्टात आले.

जॉन नंतर प्रिया रांचलच्या प्रेमात वेडा झाला होता जी आता जॉन अब्राहमची पत्नी देखील आहे आणि हि बातमी जॉनने बिपाशापासून लपवून ठेवली होती. त्यावेळी जॉनने बिपाशाला हे कळू दिले नाही की त्याला प्रिया रुंचल आवडते. पण मध्ये नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉनने ट्विट करुन आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, ज्यात त्याने स्वतः आणि प्रिया बद्दल संपूर्ण जगाला सांगितले.

जॉनने ट्वीट केलेः “प्यार और खुशी इस साल आपके साथ हो. लव जॉन और प्रिया अब्राहम”. या ट्वीटमुळे बिपाशाला जॉनच्या नात्याबद्दल सर्व काही समजले आणि ती खूप चिडली. या नंतर बिपाशाने जॉनशी सर्व संबंध तोडले.

एका मुलाखतीत बिपाशा म्हणाली की जेव्हा तिला जॉनच्या नात्याबद्दल कळले तेव्हा तिला धक्का बसला, या धक्क्यामुळे बिपाशाने लोकांना भेटणे बंद केले. ब्रेकअपच्या इतक्या वर्षानंतरही जॉन आणि बिपाशा एकमेकांशी बोलत नाहीत.जॉननंतर, बिपाशानेही 2016 मध्ये करण ग्रोवरशी गाठ बांधली. करण ग्रोव्हरचे बिपाशा सोबत हे तिसरे लग्न आहे. करणचे त्याआधी दोन लग्न झाली आहेत.

admin