बोनी कपूरच्या बेडवरच्या ‘त्या’ सवयीला कंटाळली होती श्रीदेवी, रोज व्हायची भांडण; जान्हवी कपूरचा धक्कादायक खुलासा

बोनी कपूरच्या बेडवरच्या ‘त्या’ सवयीला कंटाळली होती श्रीदेवी, रोज व्हायची भांडण; जान्हवी कपूरचा धक्कादायक खुलासा

बॉलिवूडची चांदनी श्रीदेवी या जगात आता नाहीत, पण त्यांच्या आठवणी आजही लोकांच्या मनात आहेत. बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी होती. ते दोघे बऱअयाचवेळा एकत्र फिरायला जाताना दिसायचे. पण बोनी कपूर यांची एक गोष्ट होती जी श्रीदेवींना आवडत नव्हती.

त्या एका गोष्टीमुळे श्रीदेवी बोनी कपूर यांच्यावर नाराज असायच्या आणि त्यांच्यात रोज भांडण व्हायची याचा खुलासा त्यांची लेक जान्हवीनं एका मुलाखतीत केला आहे. श्रीदेवी यांचे नाव अनेक दिग्गज अभिनेत्यांशी जोडले गेले आहे. श्रीदेवीने मिथुन चक्रवर्तीसोबत गुपचूप लग्न केल्याचेही वृत्त होते, मात्र काही काळानंतर दोघेही वेगळे झाले.

मात्र, याचा कोणताही पुरावा आतापर्यंत समोर आलेला नाही. श्रीदेवी यांनी 1966 मध्ये बोनी कपूरसोबत लग्न केले आणि त्या अर्जुन कपूरची सावत्र आई झाल्या. रिपोर्ट्सनुसार, श्रीदेवी लग्नाआधी गरोदर राहिल्या होत्या आणि लग्नानंतर त्यांनी जान्हवी कपूरला जन्म दिला.

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्यात खूप प्रेम होते. मात्र, बोनी कपूर यांच्या काही सवयींमुळे श्रीदेवी त्रस्त झाल्या होत्या, त्यामुळे दोघांमध्ये भांडणे होत होती. याचा खुलासा खुद्द जान्हवीने केला आहे. अलीकडेच एका मीडिया हाऊसशी चर्चा करताना जान्हवीनं सांगितले की, ‘बोनी कपूर याना सिगारेट ओढायची खूप आवड होती आणि आम्हाला या व्यसनापासून मुक्ती हवी होती.

यामुळे जान्हवी आणि तिची बहीण खुशी कपूर पापाची सिगारेट सोडवण्यासाठी नवनवीन मार्गाने प्रयत्न करायचे, जसे कधी ते सिगारेट कापायचे तर कधी सिगारेटच्या डब्यात टूथपेस्ट टाकायचे, पण त्यांची हि सवय सुटायचं नाव घेत नव्हती.’

जान्हवीनं पुढे सांगितलं की, ‘त्यांच्या या सवयीमुळे त्यांचं आईशी (श्रीदेवी) खूप भांडण व्हायचे, कारण आईलाही त्याची ही सवय आवडत नव्हती. जान्हवीनं सांगितले की, एक वेळ अशी होती की श्रीदेवी यांनी मांसाहार सोडला होता, तर डॉक्टरांनी त्यांना तसे न करण्याचा सल्ला दिला. कारण त्यांना बोनी कपूरच्या सिगारेटपासून मुक्ती मिळवायची होती, म्हणून त्या शाकाहारी झाल्या, त्या म्हणाल्या, जोपर्यंत तुम्ही धूम्रपान सोडत नाही तोपर्यंत मी मांसाहार करणार नाही .’

जान्हवी कपूरने सांगितले की, ‘डॉक्टरांनी आईला सांगितले की तू खूप कमजोर झाली आहेस आणि तू जास्त नॉनव्हेज खा, पण तिने नकार दिला, पण शेवटी आईचा स्वास्थासाठी वडिलांनी त्यांची धूम्रपानाची सवय सोडली.’ जान्हवी कपूर लवकरच तिच्या वडिलांच्या ‘मिली’ चित्रपटात दिसणार आहे.

‘मिली’च्या माध्यमातून ती पहिल्यांदाच वडिलांसोबत काम करत आहे. जान्हवी कपूरचा हा चित्रपट ‘हेलन’ या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

admin