एकदा कंबर हलवण्यासाठी तब्बल एव्हडी रक्कम आकारतात या सुंदरी..

एकदा कंबर हलवण्यासाठी तब्बल एव्हडी रक्कम आकारतात या सुंदरी..

बॉलीवूड चित्रपटात डान्स नंबर नसेल तर काय मजा आहे. अनेक चित्रपटांमध्ये गरज नसतानाही डान्स नंबर नक्कीच ठेवला जातो. या डान्स नंबरसाठी चित्रपट अभिनेत्रीही मोठी रक्कम घेतात.

नोरा फतेही
डान्सिंग क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली ‘दिलबर’ गर्ल एका डान्स नंबरसाठी खूप मोठी रक्कम घेते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तीला चित्रपटात कास्ट करण्यासाठी निर्मात्यांना सुमारे 3-4 कोटी रुपये खर्च करावे लागतात.

सनी लिओनी
अभिनेत्री सनी लिओनला त्यांच्या चित्रपटांमध्ये घेणे हे निर्मात्यांसाठी फायदेशीर सौदा आहे. त्यामुळेच अभिनेत्रीची जवळपास सर्वच आयटम साँग हिट राहिली आहेत. रिपोर्ट्सनुसार, ती एका डान्स नंबरसाठी पूर्ण 3 कोटी रुपये घेते.

प्रियांका चोप्रा
बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने बबली बदमाश आणि राम जाने यांसारख्या गाण्यांवर नृत्य करून लोकांना आश्चर्यचकित केले. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने तिच्या आयटम साँगसाठी 3 कोटी रुपये घेतले होते.

जॅकलिन फर्नांडिस
एक, दो, तीन सारख्या ब्लॉकबस्टर गाण्यांच्या रिमेक आवृत्तीसाठी अभिनेत्रीने सुमारे 3 कोटी रुपये चार्ज केले होते.

करीना कपूर खान
अभिनेत्री करीना कपूर खानची फीस ऐकून तुम्हाला धक्का बसेल. दबंग 2 मध्ये ‘फेविकॉल’वर या अभिनेत्रीने धमाकेदार डान्स केला. बेबोने या गाण्यासाठी निर्मात्यांकडून पैसे घेतले नाहीत आणि ते विनामूल्य केले. पण यानंतर अभिनेत्रीने तिच्या डान्स नंबरसाठी फीमध्ये प्रचंड वाढ केली. ‘हलकट जवानी’साठी अभिनेत्रीने 5 कोटी रुपये घेतले होते.

समंथा रुथ प्रभू
दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री समंथा रुथ प्रभू अल्लू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटासाठी 2 कोटी रुपये मानधन घेत असल्याची माहिती आहे.

मल्लिका शेरावत
मल्लिका शेरावतला चित्रपटांमध्ये कास्ट केल्याने निर्मात्यांच्या खिशाला मोठा फटका बसतो. एका आयटम साँगसाठी ही अभिनेत्री जवळपास 1.5 कोटी रुपये मानधन घेते.

मलायका अरोरा- एका गाण्यासाठी ही अभिनेत्री एक कोटी रुपये मानधन घेते.चित्रांगदा सिंग- ‘कुंडी मत खटकाओ राजा’ सारख्या सुपरहिट गाण्यासाठी चित्रांगधा सिंहने 80 लाख रुपये चार्ज केले होते.

मौनी रॉय
अभिनेत्री मौनी रॉयने KGF चित्रपटातील तिच्या ‘गली गली में फिरता है’ या गाण्याने इंटरनेट हादरवून टाकले. या गाण्यासाठी अभिनेत्रीने 40 लाख रुपये घेतले होते.

admin