५ वर्षांचं करिअर अन् २ बड्या अभिनेत्रींसोबत इंटिमेट सीन; एकीचे वय दुप्पट तर दुसरी १३ वर्षांनी मोठी

५ वर्षांचं करिअर अन् २ बड्या अभिनेत्रींसोबत इंटिमेट सीन; एकीचे वय दुप्पट तर दुसरी १३ वर्षांनी मोठी

बॉलिवूड अभिनेता इशान खट्टर याने अवघ्या ५ वर्षांच्या कारकिर्दीत मोठी लोकप्रियता मिळवली आहे. त्याने बॉलिवूडमध्ये मुख्य हिरो म्हणून सक्रिय होण्यापूर्वी त्याने बालकलाकार आणि असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. इशानने ‘वाह लाइफ हो तो ऐसी’ या सिनेमात बालकलाकार म्हणून काम केले आहे.

बॉलिवूडमध्ये त्याला विशेष लोकप्रियता ‘धडक’ या सिनेमाने दिली. इशान आणि अभिनेत्री जान्हवी कपूरचा हा पदार्पणाचा सिनेमा मराठमोळ्या ‘सैराट’चा रिमेक आहे. या सिनेमातील गाण्यामुळेही इशान चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय झाला.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर त्याने मजिद मजिदी यांचा ‘बियाँड द क्लाउड’ या सिनेमात मुख्य भूमिका साकारली. यानंतर तो ‘धडक’, ‘खालीपीली’ या सिनेमांमध्ये दिसला. डोन्ट लूक अप या इंग्रजी सिनेमात तो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. तर लवकरच अभिनेता ‘फोनभूत’ आणि ‘पिप्पा’ या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. इशानने ‘ए सुटेबल बॉय’ या सीरिजमध्ये काम केले आहे.

इशानने अभिनेत्री तब्बू हिच्यासोबत ‘ए सुटेबल बॉय’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या वेब सीरिजमध्ये तब्बू आणि इशान यांच्यामध्ये किसिंग सीन दाखवण्यात आला आहे. दुप्पट वयाच्या अभिनेत्रीसोबत असलेल्या या किसिंग सीनमुळे इशान विशेष चर्चेत आला होता. तब्बू इशानपेक्षा वयाने जवळपास दुप्पट मोठी आहे.

अभिनेत्री कतरिना कैफ, अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर स्टारर ‘फोनभूत’ सिनेमा ४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होताच त्यातील एका इंटिमेट सीनची विशेष चर्चा झाली. या सिनेमात इशान आणि कतरिनाचा इंटिमेट सीन पाहायला मिळतो आहे.

यात कतरिना रागिणी नावाच्या भूताच्या भूमिकेत आहे, त्यामुळे भूत आणि माणूस यांच्यातील लव्ह अँगल प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतो. इशान आणि कतरिनामध्ये साधारण १३ वर्षांचे अंतर आहे. अवघ्या काहीच दिवसात या सिनेमा प्रदर्शित होणार असल्याने सध्या या सिनेमाची टीम प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

admin