या व्यक्तीसह लग्न गाठीत अडकणार अभिनेत्री हृता दुर्गुळे, फोटोज् झाले व्हायरल….

या व्यक्तीसह लग्न गाठीत अडकणार अभिनेत्री हृता दुर्गुळे, फोटोज् झाले व्हायरल….

नमस्कार मित्रांनो, मन उडू उडू झालं आणि फुलपाखरू या मालिकेतील हृता दुर्गुळे अठरा दिवसांमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा सगळीकडे रंगत आहे. तसेच या बद्दल ची सर्व माहिती स्वतः हृता दुर्गुळेने शेअर केली आहे.

तर अभिनेत्री हृता दुर्गुळे ने आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना वेड लावले आहे. तसेच सोशल मीडियावर तिचा मोठा चहाते वर्ग आहे. सध्या ती झी मराठी वाहिनीवरील मन उडू उडू झालं या मालिकेमध्ये ती मुख्य भूमिका साकारत आहे.

अभिनेता अजिंक्य राव याच्यासोबत ती मन उडू उडू झालं या मालिकेत दिसत आहे. तसेच याआधी हृताने दुर्वा, फुलपाखरू यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. दूर्वा मध्ये अभिनेता हर्षद अतकरी तर फुलपाखरू मध्ये अभिनेता यशोमान आपटे सोबत तिची जोडी चांगलीच लोकप्रिय झाली होती.

दरम्यानच्या काळात तिने दादा एक गुड न्यूज आहे तसेच अनन्या यांसारख्या नाटकांमध्येही काम केले आहे. तर महाराष्ट्राचा सिंगिंग स्टार या रिॲलिटी शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी देखील स्वीकारली होती.

तसेच ती सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. आपल्या चाहत्यांसाठी ती पोस्ट च्या माध्यमातून नेहमीच नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. हल्लीच केलेल्या एका पोस्टमध्ये तिने तिच्या प्रेमाचा खुलासा केला होता. एक दिवस तिने प्रतीक शाह सोबत एक रोमँटिक फोटो शेअर करत तिने प्रेमाची जाहीर कबुली दिली.

तसेच प्रतीक ने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचे दिग्दर्शन सुद्धा केलेले आहे. सोशल मीडियावर हृताच्या एका पोस्ट नंतर तिच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. कारण प्रतीक सोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत तिने कॅप्शन मध्ये एटीन डेज टू गो म्हणजेच आता फक्त अठरा दिवस बाकी असं लिहिलं आहे.

आता नेमकं 18 दिवस कशासाठी राहिले आहेत. ऋता खरंच लग्न करते की साखरपुडा करते असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. तर या प्रश्नांची उत्तरं ऋता आणि प्रतीकच देऊ शकतील.

admin