सुंदर दिसण्यासाठी या अभिनेत्रींनी घेतला प्लॅस्टिक सर्जरीचा आसरा.. जुने फोटोज पाहून चकित व्हाल..

सुंदर दिसण्यासाठी या अभिनेत्रींनी घेतला प्लॅस्टिक सर्जरीचा आसरा.. जुने फोटोज पाहून चकित व्हाल..

आपल्या भारतीय समाजव्यवस्थेत आजही मनाने सुंदर असण्यापेक्षा सुंदर दिसण्याला जास्त प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याने सुंदर दिसावं. आता प्रत्येकाच्याच नशिबात सुंदर चेहरा नसतो. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी काही लोक अनैसर्गिकरित्या प्लास्टिक शस्त्रक्रियेचा आसरा घेतात.

आपल्या सामान्य लोकांच्या जीवनात ही बाब जरी अतिशय कमी प्रमाणात दिसत असली तरीही आपली चित्रपट सृष्टी म्हणजेच बॉलिवूड ही एक अशी इंडस्ट्री आहे जिथे अश्या घटना सर्रास घडताना दिसतात. ही इंडस्ट्रीच अशी आहे जिथे फक्तंणी फक्त दिसण्याला प्राधान्य दिले जाते.मग अशा वेळी या अभिनेत्र्यांकडे प्लास्टिक सर्जरीवाचून पर्याय नसतो.

वास्तविक प्लास्टिक सर्जरीने बॉलिवूडच्या बर्‍याच अभिनत्र्यांचं सौंदर्य आणखी सुंदर बनविले आहे. कारण बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सौंदर्याला किती महत्त्व दिलं जातं हे आपणास ठाऊकच आहे. बॉलिवूडमध्ये बर्‍याच अभिनेत्र्या अशा आहेत ज्या आता खुपच सुंदर दिसत आहेत, परंतु पूर्वी मात्र त्या इतक्या सुंदर नव्हत्या.

मग त्यांनी प्लास्टिक सर्जरीचा मार्ग स्वीकारून हे सौंदर्य मिळवलं आहे. तर आज आम्ही तुम्हाला त्याच अभिनेत्र्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी प्लास्टिक सर्जरी करून हे सौंदर्य मिळवले आहे.

श्रुती हासन:

श्रुती हासन ही दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील एक यशस्वी अभिनेत्री आहे आणि तिने बॉलिवूडमध्ये बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. श्रुती ही
चित्रपट निर्माता कमल हासनची मुलगी आहे आणि तिच्या सौंदर्यामुले ती अनेक लोकांना वेड लावत आहे. याचे कारणही तसेच आहे.

श्रुती दिसायला इतकी सुंदर आहे की प्रत्येकजण तिच्याकडे आकर्षित झालाच पाहिजे. खरंतर आज श्रुती जितकी सुंदर दिसत आहे तीतकी ती पूर्वी सुंदर नव्हती, पण प्लास्टिक सर्जरीने तिला हे सौंदर्य लाभलं. आज श्रुतीही साऊथ इंडियन चित्रपटांसोबतच बॉलिवूड मध्येही आपले नाव कमावत आहे.

जान्हवी कपूर:

अलीकडेच जाह्नवी कपूरने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात धडक या चित्रपटाने केली होती आणि जाह्नवीचा पहिला चित्रपट सुपरहिट ठरला. वास्तविक जाह्नवी ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी आहे. आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात करण्यापूर्वी जाह्नवीने सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरीची मदत घेतली आहे हे ही तितकेच खरे.

शिल्पा शेट्टी:

जर आजच्या घडीला शिल्पाकडे नजर टाकली तर तुम्ही म्हणाल शिल्पाच्या वयानुसार तिचे सौंदर्य दिवसेंदिवस वाढत आहे. एका मुलाची आई असूनही शिल्पा खूपच सुंदर आणि तरुण दिसते. शिल्पा तिच्या सौंदर्य सौंदर्यावर विश्वास ठेवते, पण शिल्पाने सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली आणि त्या मुळे आज ती खूपच सुंदर दिसत आहे. शिल्पाने आपल्या करिअरची सुरुवात बाजीगरपासून केली होती आणि या चित्रपटात ती आजपेक्षा पूर्णपणे वेगळी दिसत आहे.

प्रियांका चोप्रा:

प्रियांका चोप्राने 2000 मध्ये मिस वर्ल्डचे जेतेपद जिंकले होते आणि मिस वर्ल्ड झाल्यानंतर प्रियंकाच्या ओठ आणि नाकावर शस्त्रक्रिया झाली आहे. तेव्हापासून ती बॉलिवूडची मुख्य अभिनेत्री झाली, याशिवाय प्रियंका केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही प्रसिद्ध झाली आहे. प्रियांका नुकतीच निक जोनस सोबत विवाह बंधनात अडकली होती, निक जोनस अमेरिकेचा पॉप सिंगर आहे.

अनुष्का शर्मा:

अलीकडेच अनुष्का शर्माने भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीशी लग्न केले आहे. अनुष्का जरी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे, पण अनुष्कानेसुद्धा सुंदर दिसण्यासाठी तिच्या चेहर्‍यावरची शस्त्रक्रिया केली आहे. म्हणजेच बॉलिवूडच्या बहुतेक नायिकांनी सौंदर्य मिळविण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा सहारा घेतला आहे.

admin