ह्या सुप्रसिद्ध अभिनेत्र्यांनी केलंय इतक्या कमी वयात लग्न.. एक तर 16व्या वर्षीच झाली 2 मुलांची आई..

ह्या सुप्रसिद्ध अभिनेत्र्यांनी केलंय इतक्या कमी वयात लग्न.. एक तर 16व्या वर्षीच झाली 2 मुलांची आई..

बॉलिवूड नावाने ओळखली जाणारी भारतीय हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये अशा काही अभिनेत्री देखील आहेत ज्यांचे लग्न अगदी लहान वयात झाले. या बॉलिवूड अभिनेत्रींनी असे का केले? का या अभिनेत्रींना इतक्या लहान वयात लग्न करण्याची गरज का पडली ? आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलिवूड अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत, ज्यांचे लग्नाचे वय ऐकून तुम्हाला जबरदस्त धक्का बसेल.

भाग्यश्री :
‘मैंने प्यार कीया’ सुपरहिट चित्रपटाची अभिनेत्री भाग्यश्री तर सर्व परिचीत आहे.. पण भाग्यश्रीने या चित्रपटानंतर लगेचच स्वतःला बॉलिवूडपासून दूर केले आणि हे त्याचे एकमेव कारण होते तिची वैवाहिक आयुष्य. भाग्यश्रीने मैने प्यार किया या चित्रपटानंतर दुसर्‍याच वर्षी व्यवसायिक हिमालय दासानीशी लग्न केले. भाग्यश्री आणि हिमालय दासानी यांचे अफेअर बरेच दिवस चालू होते, नंतर दोघांचे लग्न झाले. भाग्यश्रीचे लग्न झाले तेव्हा ती फक्त 19 वर्षांची होती. भाग्यश्रीने करिअर आणि प्रेमापैकी तिचे प्रेम निवडले आणि ती आपल्या कुटुंबात व्यस्त झाली.

डिंपल कपाडिया :

डिंपल कपाडिया या अभिनेत्रीने आपल्या पहिल्याच ‘बॉबी’ या सिनेमातून पदार्पण करून बॉलिवूड जगतात खळबळ उडवून दिली आणि वयाच्या 16 व्या वर्षी सुपरस्टार राजेश खन्नाशी लग्न केले. राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्यात वयाचा बराच फरक होता, असे असूनही दोघांनीही एकमेकांचे हात धरले आणि लग्न केले.

दोघांनाही दोन मुली आहेत पण नंतर या दोघांची मतांतरे होऊ लागली आणि मग डिंपल कपाडियाने राजेश खन्नापासून वेगळे राहायला सुरुवात केली. डिंपलने तिच्या दोन्ही मुली एकट्याने वाढवल्या. त्यांची मोठी मुलगी ट्विंकल खन्नाने सुपरस्टार अक्षय कुमारशी लग्न केले. डिंपल कपाडिया ही 80 च्या दशकातील टॉपची अभिनेत्री आहे आणि आजही ती खूपच सुंदर दिसत आहे.

दिव्या भारती :

बॉलिवूडची चपखल आणि गोंडस अभिनेत्री दिव्या भारती आजही लोकांच्या स्मरणात आहे. तिने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकताच दिव्या भारतीची गणना टॉप अभिनेत्रींमध्ये केली गेली. दिव्या भारती हिनेदेखील वयाच्या 18 व्या वर्षी निर्माते साजिद नाडियाडवालाबरोबर लग्न केले. दिव्या भारती हिचे लग्नाच्या एका वर्षा नंतर नि ध न झाले. आजही दिव्या भारतीच्या मृ त्यू विषयी लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत की अशा यशस्वी अभिनेत्रीने आ त्म’ह’ त्या का केली? बरेच लोक यास ह’त्या मानतात. सत्य काय आहे, ही वेळ सांगेल, पण लवकरच दिव्या भारती या जगाला नि रोप घेऊन गेली, त्यामुळे तिचे चाहते खूप दुःखी झाले.

उर्वशी ढोलकिया :

टीव्ही इंडस्ट्रीची बोल्ड आणि सुंदर अभिनेत्री उर्वशी ढोलकिया आजही लोकांना ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेच्या कोमोलिकाच्या रूपात स्मरणात आहे. उर्वशी ढोलकियाने खलनायिकेची भूमिका इतक्या चांगल्या प्रकारे साकारली की लोक तीच्या अभिनयावर फिदा झाले होते. टीव्हीवर आपल्या अभिनयाने सर्वांचे मन जिंकणारी उर्वशी ढोलकिया हिचे वैयक्तिक आयुष्य मात्र खूपच अस्थिर होते. वृत्तानुसार उर्वशी ढोलकिया यांचे वयाच्या 15 व्या वर्षी लग्न झाले होते आणि वयाच्या 16 व्या वर्षी ती सागर आणि क्षितिज या जुळ्या मुलांची आई झाली.

असे म्हटले जाते की उर्वशी ढोलकिया लग्नाच्या दीड वर्षानंतरच तिच्या पतीपासून विभक्त झाली होती. यानंतर उर्वशी ढोलकियाने एकटीने आपल्या मुलांचे संगोपन केले. उर्वशीची मुले लहान असताना, त्यांना तासन्तास शूटिंगवर रहावं लागत असे. उर्वशीने मुलांच्या संगोपनासाठी खूप मेहनत घेतली आहे. उर्वशी आजही एक अविवाहित आई आहे आणि आता तिची दोन्ही मुले मोठी झाली आहेत.

admin