ही भारतीय सुंदरी करतेय पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अली सोबत लग्न.. चाहत्यांनी दर्शवली नापसंती..

ही भारतीय सुंदरी करतेय पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अली सोबत लग्न.. चाहत्यांनी दर्शवली नापसंती..

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली लवकरच भारतीय मुलगी शमिया आरझूशी दुबईत लग्न करणार आहे. दोघे एका वर्षापूर्वी दुबईमध्ये एका मित्राच्या माध्यमातून भेटले होते आणि त्यानंतर त्यांची मैत्री वाढली व मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले त्यांना कळालेच नाही.

शामिया हा मूळची हरियाणामधील नुह जिल्ह्यातील चांदेनी गावची आहे. तिने मानव रचना युनिव्हर्सिटी, गुडगाव येथून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेकची पदवी घेतली आहे. गेल्या तीन वर्षांपासून ती दुबईतील एमिरेट्स एअरलाइन्समध्ये उड्डाण अभियंता म्हणून कार्यरत आहे. तिचे कुटुंबिय मात्र नवी दिल्ली येथे स्थायिक आहेत.

आमच्या कुटुंबियांना हे प्रकरण खाजगी ठेवावेसे वाटले होते, परंतु ही बाब प्रसारमाध्यमात उघडकीस आल्यामुळे माझ्या लग्नाबाबत मी अधिकृत घोषणा करण्याचा निर्णय घेतला, ”हसन यांनी या महिन्याच्या सुरुवातीला आपल्या गुजराणवाला या गावी झालेल्या एका पत्रकार परिषदेत सांगितले. लग्नानंतर शामिया देखील याच गावी राहणार आहे. हसनने हेही उघड केले की त्यांनेच प्रथम तिच्यासमोर प्रेम व्यक्त केले आणि त्यानंतर कुटुंबीयांनी हस्तक्षेप करण्यापूर्वीच त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला.

लग्नाची तयारी लवकरच सुरू होणार आहे. सोमवारी मेहंदी व निक्का आयोजित करण्यात आले होते. लग्नापूर्वीच्या फोटोशूटसाठी हे जोडपं दुबईच्या आसपासही गेले होते आणि जुमेराह बोर्ड वॉक, अटलांटिस, बुर्ज खलिफा आणि बुर्ज अल अरब यासारख्या ठिकाणी त्यांची छायाचित्रे घेण्यात आली होती.

पीसीबीने आयोजित केलेल्या कोचिंग शिबिरामुळे पाकिस्तानी संघ सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता नाही. तथापि, फिरकी गोलंदाज शादाब खान यापूर्वीच या लग्नासाठी दुबईला पोहोचला आहे. पीसीबीने हसनला सहा दिवसांची रजा मंजूर केली आहे.

शमियाचे वडील, लियाकत अली, जे एक निवृत्त ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर आहे त्यांनी गेल्या महिन्यात एका वृत्तपत्राला सांगितले होते की, “तिचे लग्न कोणाशीही होवो, मग तो एक भारतीय असो किंवा पाकिस्तानी. ती आनंदी आहे आणि ते दोघेही एकमेकांना आवडतात. आम्ही कुटुंबीय म्हणून त्यांच्या निर्णयाचा आदर करतो. “

“फाळणीच्या वेळी आमचे बरेच नातेवाईक पाकिस्तानात गेले होते. पाकिस्तानमध्ये आमचे कुटुंब वाढले आहे आणि आम्ही आमच्या मुलींचे लग्न पाकिस्तानी मुलाशी करण्याची ही काही पहिली वेळ नाही” असे ते म्हणाले.

झहीर अब्बास, मोहसीन खान आणि शोएब मलिक नंतर हसन भारतीय मुलीशी लग्न करणारा चौथा पाकिस्तानी क्रिकेटपटू होईल. मलिकने एप्रिल २०१० मध्ये भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाशी लग्न केले आणि या जोडप्यास आता एक मुलगा आहे.

admin