‘शाका लाका बूम बूम’ मधली ही बालकलाकार आठवतेय का, बघा आता कशी दिसते, हिचाच MMS लीक झाला होता

‘शाका लाका बूम बूम’ मधली ही बालकलाकार आठवतेय का, बघा आता कशी दिसते, हिचाच MMS लीक झाला होता

‘शाका लाका बूम बूम’ ही मालिका आठवत असेल तर त्यातला एक चेहराही तुम्हाला नक्की आठवत असणार. ती म्हणजे बालकलाकार हंसिका मोटवानी. या मालिकेतून हंसिका बालकलाकार म्हणून दिसली होती. यानंतर ती चित्रपटांकडे वळली.

क्योंकी सास भी कभी बहू थी, सोनपरी, करिश्मा का करिश्मा अशा अनेक टीव्ही मालिकेत हंसिका झळकली होती. अनेक मालिकांमध्य काम केल्यानंतर हंसिकाने साऊथ फिल्म इंडस्ट्रीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. त्यावेळी तिचे वय होते 15 वर्षे. तिच्या पहिल्या तेलगू सिनेमाचे नाव होते ‘देसमुदुरू’. या पहिल्या चित्रपटानंतर हंसिकाने साऊथ इंडस्ट्रीत एकापेक्षा एक हिट सिनेमांचा धडका लावला.

2007 साली हिमेश रेशमियाच्या ‘आपका सुरूर’ या सिनेमात हंसिका झळकली आणि तिला पाहून सगळ्यांनाच धक्का बसला होता. कारण काय तर त्यावेळी हंसिकाचे वय होते केवळ 16 वर्षे आणि चित्रपटात ती वयापेक्षा कितीतरी मोठी दिसली होती. त्याआधी 2003 मध्ये ‘कोई मिल गया’ या सिनेमात ती बालकलाकार म्हणून दिसली होती आणि चारच वर्षांनी ‘आपका सुरूर’मध्ये ती लीड हिरोईन होती.

‘कोई मिल गया’मधली बालकलाकार अचानक इतकी मोठी झालेली पाहून सर्वच हैराण झाले होते. मग काय यावरून वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. लवकर मोठे होण्यासाठी हंसिकाने हार्मोनल इंजेक्शन घेतल्याचे याकाळात बोलले गेले होते. हंसिकाची आई स्किन स्पेशालिस्ट आहे.

तिनेच हंसिकाला ग्रोथ हार्मोनल इंजेक्शन दिलेत, अशी चर्चाही रंगली होती. अर्थात हंसिकाने यावर कधीच प्रतिक्रिया दिली नाही. 2008 मध्ये हंसिकाचा ‘मनी है तो हनी है’ हा दुसरा सिनेमा रिलीज झाला. यानंतर मात्र बॉलिवूडमध्ये ती फार जम बसवू शकली नाही. साऊथमध्ये मात्र ती आघाडीची अभिनेत्री म्हणून उदयास आली.

2015 मध्ये हंसिका एका मोठ्या वादात अडकली होती. तिचा एक बाथरूम एमएमएस लीक झाला होता. यावरून मोठे वादळ उठले होते. असे व्हिडीओ लीक होणे हे ब ला त्का रा पेक्षाही वाईट असते, असे हंसिका यावर म्हणाली होती. पण हंसिका या वादाला धैर्याने सामोरी गेली.

हंसिका सर्वाधिक कमी वयाची अशी हिरोईन आहे, जिचे मदुराईमध्ये मंदिर आहे. होय, चाहत्यांनी मदुराईमध्ये तिचे मंदिर बनवले आहे. यात हंसिकाची मूर्ती आहे.

admin