‘त्याने कोणती अंडरप्यांट घातली…’, भर कार्यक्रमात हे काय बोलून गेली गोविंदाची पत्नी

‘त्याने कोणती अंडरप्यांट घातली…’, भर कार्यक्रमात हे काय बोलून गेली गोविंदाची पत्नी

बॉलिवूड कपल हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहतात. लोकप्रिय कपल्सपैकी एक म्हणजे अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहे. बऱ्याच कार्यक्रमात हे कपल हजेरी लावतं. हे दोघे नुकतेच ‘इंडियन आयडॉल 13’ मध्ये पहिल्यांदा थिरकताना दिसले.

आजवर गोविंदानं अनेक अभिनेत्रींनबरोबर नाचताना दिसला आहे. पण यावेळी तो पहिल्यांदा पत्नीसोबत डान्स करताना दिसला आहे. यावेळी त्यांच्या मुलां देखील हजेरी लावली होती. दरम्यान, या आधी गोविंदा आणि सुनीता यांनी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी कपिल शर्मा गंमतीजमतीत त्या दोघांना खासगी आयुष्याबद्दल खासगी प्रश्न विचारले.

हे प्रश्न विचारत ते एकमेकांना किती ओळखतात हे कपिल टेस्ट करत होता. सगळ्यात आधी गोविंदाला प्रश्न विचारत कपिल म्हणाला, सुनीता मॅडमनं कोणते कानातले घातले आहेत? कोणते नेलपेंट लावली आहे? यातील कोणत्याच प्रश्नावर गोविंदा उत्तर देता आलं नाही, कपिलला मध्येच थांबवत सुनीता म्हणाली ‘कपिल तू कोणाला प्रश्न विचारतोयस, याने कोणती अंतर्वस्त्र घातली आहेत ते सुद्धा मी सांगू शकते’.

सुनीता यांचे हे उत्तर ऐकताच कपिलसोबत तिथे उपस्थित असलेली प्रेक्षकदेखील हसायला लागले.गोविंदा आणि सुनीता यांनी 11 मार्च 1987 रोजी एका मंदिरात लग्न केलं. त्यांनी 4 वर्ष लग्न गुपित ठेवलं होतं. त्यांच्या लग्नाला आता 36 वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. टीना आहुजा आणि यशवर्धन आहुजा अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत.

admin