एकेकाळी तिच्या हॉट अदांवर रसिक व्हायचे फिदा,नंतर भीक मागून खायची आली वेळ, कित्येकवर्षापासून होती दुर्लक्षितच

एकेकाळी तिच्या हॉट अदांवर रसिक व्हायचे फिदा,नंतर भीक मागून खायची आली वेळ, कित्येकवर्षापासून होती दुर्लक्षितच

स्वप्नांची दुनिया, मायानगरी, झगमगत्या दुनियेत करियर करण्याचं स्वप्न घेऊन अनेकजण येतात. त्यापैकी सगळ्यांनाच इथं झटपट यश मिळतं असंही नाही.कारण कोणतंही क्षेत्र असो त्यात स्ट्रगल कुणालाही चुकला नाही. मात्र अशा आव्हानात्मक परिस्थितीतही मेहनतीच्या जोरावर अनेक कलाकार सुपरस्टारपदावर पोहचले आहेत.

रसिकांच्या गळ्यातील ते ताईत बनले आहेत. करिअरच्या ऐन भरात असताना या कलाकारांना रसिकांचं प्रेम, अमाप लोकप्रियता आणि बक्कळ पैसाही मिळतो. मात्र जशी चांगली बाजू तशी दुसरी बाजूही आहे. कारण इथं उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची प्रथा आहे.

करिअर ऐन भरात असताना सेलिब्रिटींचं कौतुक होतं,प्रेम मिळतं. मात्र नशीबाचे चक्र असे काही फिरतात की, कमावलेलं सगळं एका क्षणात नाहीसं होते. गीतांजली नागपाल यापैकीच एक प्रख्यात नाव. ९० च्या दशकात मॉडेलिंग क्षेत्रात तिचे प्रचंड नाव होते.

ती जिथे -जिथे जायची तिची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांचा तिच्या अवतीभोवती गराडा असायचा. पूर्व मिस यूनिवर्स सुष्मिता सेनसह तिने रॅम्पवॉक करत सा-यांची मनं जिंकली होती. ती एका आर्मी ऑफिसरची मुलगी होती. मात्र ड्र’ग्सच्या आहारी गेल्याने तिचे सारे आयुष्यच संपवून टाकले.

ड्र’ग्सशिवाय ती राहूच शकत नव्हती. अखेर तिला काम मिळणे जेव्हा बंद झाले तेव्हा दुस-यांच्या घरी भांडी घासण्याची तिच्यावर वेळ आली होती. इतकेच नाही तर मुंबईच्या रस्त्यांवर तिला अनेकदा भीक मागतानाही पाहिले गेले. तिची इतकी बिकट परिस्थीती झाली की मुंबईच्या रस्त्यावरच तिला रात्र काढावी लागायची.

admin