मोठी बहीण सुपरस्टार, तर छोटी बहीण सुपर फ्लॉप असलेल्या सेलिब्रेट बहिणी, तुम्हाला नक्कीच माहीत नसतील या बहिणी

मोठी बहीण सुपरस्टार, तर छोटी बहीण सुपर फ्लॉप असलेल्या सेलिब्रेट बहिणी, तुम्हाला नक्कीच माहीत नसतील या बहिणी

बॉलिवूडचे जग असे आहे,जिथे आपल्या अभिनयासह आपले नशीब ही चांगले असावे लागते.कारण बॉलिवूडच्या या जगात लोकांना येण्याची संधी सहजा सहजी मिळत नाही, परंतु असे काही लोक आहेत,ज्यांनी बॉलीवूडमध्ये पाऊल तर ठेवले, पण चांगले नाव कमवु शकले नाही.

आपण,बॉलिवूडच्या अनेक जोडप्यांविषयी ऐकले तर असेलच परंतु ,आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या त्या बहिणींबद्दल सांगणार आहोत ,ज्या खर्या आयुष्यात बहिणी आहेत.त्यांच्या विषयी सांगायचे झाले तर, थोरल्या बहिणीने चित्रपट कारकीर्दीत बरेच नाव कमवले आहे, पण लहान बहिण पूर्णपणे फ्लॉप झाली आहे.

शिल्पा शेट्टी आणि स्मिता शेट्टी – शिल्पा शेट्टी ही बॉलीवूड चा एक प्रसिद्ध चेहरा आहे. केवळ चित्रपटांमध्येच नाही तर टीव्ही जगा पासुन तर हॉलिवूडपर्यंत तिने आपली जादू केली आहे. जरी यावेळी शिल्पाने स्वत: ला चित्रपटांपासून दूर केले आहे,तरीही अनेक कार्यक्रमांमध्ये तिला न्यायाधीश म्हणून पाहिले जाते.

याशिवाय ती आपल्या फिटनेससाठी देखील ओळखली जाते. तिचे योग आणि व्यायाम करणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. तिच्या बहिणी ‘स्मिता’बद्दल बोलायचे झाले तर तिने ‘मोहब्बतें’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यानंतर ती इतर चित्रपटांमध्ये ही दिसली,पण चित्रपटांमध्ये तिला शिल्पा सारखी ओळख मिळु शकली नाही.त्यानंतर स्मिताने चित्रपट जगातून निरोप घेतला.

काजोल आणि तनिषा – काजोल 90 च्या दशकातिल प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.तिची चित्रपट कारकीर्द खूप चांगली होती, तिने तिच्या कारकिर्दी ला अनेक हिट फिल्म्स धिल्यायत, पण तिची लहान बहीण ‘तनिषा’बद्दल बोलायचे झाले तर,ती चित्रपटांमधे मागे राहिली. तनिशाने बॉलिवूडमध्ये डेब्यू ‘नील आणि निक्की’ या चित्रपटाद्वारे केला होता, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता, तनिषा चा कोणताही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कामगिरी करू शकला नाही, यामुळे तिने चित्रपटांचा विचार सोडून धिला.

ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना – ट्विंकल खन्ना देखील तिच्या काळातील सर्वोच्च अभिनेत्रींपैकी एक होती, तिने तिच्या कारकीर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आणि लोकांना देखिल ती खूप आवडली.आज ती चित्रपटांमध्ये काम करत नसली तरी ‘लेखक’आणि ‘अक्षयची पत्नी’ म्हणून ती चर्चेत राहिली आहे.

ट्विंकलची धाकटी बहीण ‘रिंकी’चे नाव ऐकले असेल, रिन्कीने गोविंदा बरोबर ‘जिस देश में गंगा रहता हैं’ या चित्रपटात काम केले होते, त्याशिवाय इतर अनेक चित्रपटांत ती दिसली होती, पण तिला चित्रपटांमधून यश मिळालं नाही.

मलायका अरोरा आणि अमृता अरोरा – मलायका अरोरा अशी एक अभिनेत्री आहे,जी ने 65 व्या वर्षीही आपल्या हॉटनेसने लोकांना वेड लावले आहे. मलायका कदाचित चित्रपटांमध्ये काम करू शकत नाही, पण तिच्या आयटम साँगमुळे ती नेहमीच चर्चेत असते, या शिवाय तिला अनेक रियालिटी शोमध्ये न्यायाधीश म्हणूनही पाहिले जाते.

तिची बहीण अमृता अरोरा देखिल,बॉलिवूड मध्ये आश्चर्यकारक काहीही काम करू शकली नाही. त्यानंतर अमृतानेही चित्रपटांचा विचार सोडून धिला.

admin