‘एलिझाबेथ एकादशी’ मधील ‘झेंडू’ नावाची चिमुरडी आठवतेय का ? आता ओळखणं देखील झालंय कठीण, आता दिसते अशी..

‘एलिझाबेथ एकादशी’ मधील ‘झेंडू’ नावाची चिमुरडी आठवतेय का ? आता ओळखणं देखील झालंय कठीण, आता दिसते अशी..

२०१४ साली परेश मोकाशी दिग्दर्शित एलिझाबेथ एकादशी हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अभिनेत्री नंदिता धुरी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होती तर श्रीरंग महाजन, सायली भंडारकवठेकर, पुष्कर लोणारकर, दुर्गेश बडवे हे बालकलाकारही प्रमुख भूमिकेत होते.

श्रीरंग महाजनने ज्ञानेश तर सायलीने मुक्ता अर्थात झेंडूची भूमिका उत्तम साकारली होती. आपली सायकल वाचवण्यासाठी या बालकलाकारांनी जो काही आटापिटा केला त्यातून घडणाऱ्या घडामोडीचे दर्शन दिग्दर्शकाने अतिशय सुरेखपणे मांडलेले पाहायला मिळाले.

विशेष म्हणजे यातील “ए गरम बांगड्या, गरम बांगडया…” हा झेंडूच्या तोंडी असलेला डायलॉग प्रेक्षकांच्या आजही स्मरणात राहतो. झेंडूची भूमिका साकारणारी सायली भंडारकवठेकर हिला अभिनयापेक्षा नृत्याची विशेष आवड आहे.

अगदी लहान असल्यापासूनच सायलीने भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती आणि यातच तिला आपले करियर करायचे आहे. पंढरपूर येथील कवठेकर प्रशालेत शिकत असताना सायली, पुष्कर आणि दुर्गेश यांना चित्रपटाच्या ऑडिशनमध्ये निवडले गेले होते.

ज्ञानेशची भूमिका साकारणाऱ्या श्रीरंग महाजनने याआधी चिंटू २ या चित्रपटात काम केले होते. श्रीरंग महाजन हा मूळचा पुण्याचा येथूनच त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.

तर पुष्कर लोणारकर ह्याने तर या चित्रपटा व्यतिरिक्त टीटीएमएम (तुझं तू माझं मी), रांजण, बाजी, चि व चि सौ का चित्रपटात काम केले आहे. शाळेत असताना त्याने अफजलखानाची भूमिका साकारली होती त्याचे खूप कौतुक देखील झाले होते.

अभिनयाव्यतिरिक्त पुष्कर शास्त्रीय संगीताचे धडे गिरवत आहे, शिवाय कविता करणे आणि ती स्वरबद्ध करणे ही आवड देखील तो जोपासत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने भागो मोहन प्यारे मालिकेत देखील एन्ट्री घेतली होती.

admin