वयाच्या ४५व्या वर्षी एकता कपूर अडकणार लग्न बंधनात? होणाऱ्या नवऱ्यासोबत केला फोटो शेअर

वयाच्या ४५व्या वर्षी एकता कपूर अडकणार लग्न बंधनात? होणाऱ्या नवऱ्यासोबत केला फोटो शेअर

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय निर्माती म्हणून एकता कपूरकडे पाहिले जाते. तिने आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांची निर्मिती केली आहे. ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिच्या आगामी प्रोजेक्ट्स विषयी चाहत्यांना माहिती देत असते.

नुकताच सोशल मीडियावर एकताचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ती एका मुलासोबत दिसत आहे. त्यामुळे हा मुलगा नक्की कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसेच एकताच्या लग्नाच्या देखील चर्चा सुरु आहेत.एकताने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्यासोबत जो मुलगा आहे त्याचे नाव तणवीर बूकवाला आहे.

एकता आणि तणवीर हे बेस्टफ्रेंड आहेत. एकता तणवीरसोबत अनेक वेळा फोटो शेअर करताना दिसते. मात्र आता शेअर केलेल्या फोटोमुळे त्यादोघांच्या लग्नाचा चर्चा सरु झाल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.

एकताने फोटो शेअर “…आणि आम्ही इथे आहोत, लवकरच तुम्हाला सांगू” अशा आशयाच कॅप्शन दिले आहे. तर तणवीरने देखील त्याफोटोवर कमेंट केली आहे. “या मैत्रीला आता नात्यात बदलण्याची वेळ आली आहे. अशी कमेंट तणवीरने केली आहे.” तणवीरच्या या कमेंटनंतर हे दोघे लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत असे म्हटले जात आहे.

दरम्यान, एकता ४५ वर्षांची असून तिचा एक सरोगसीच्या माध्यमातून मुलगा आहे. एकताने अजून लग्न केलेले नाही. १९ वर्षांची असताना एकताने आई शोभा कपूरसोबत मिळून बालाजी टेलीफिल्म्सची स्थापना केली होती. आज दोघी मिळून बालाजी टेलीफिल्म्स सांभाळतात. तिच्या अनेक मालिका हिट ठरल्या आहेत.

admin