चक्क कुत्र्याला स्वतःचा बॉयफ्रेंड म्हणतेय ही अभिनेत्री, इंस्टावर फोटो पण केलेत शेअर.

चक्क कुत्र्याला स्वतःचा बॉयफ्रेंड म्हणतेय ही अभिनेत्री, इंस्टावर फोटो पण केलेत शेअर.

आजकाल लोक आपल्या वयक्तिक जीवनाबद्दल अनेक खुलासे करत असतात. काही लोक आपले प्रियकर प्रेयसी बद्धल सोशल मीडिया वर शेयर करतात. असे अनेक खुलासे आपण रोज ऐकतो. असाच एक अजब किस्सा ऐकायला मिळाला आहे.

अभिनेत्री इलियाना डिक्रूझ तिच्या सौंदर्यासाठी परिचित आहे, त्याचबरोबर तिचा अभिनयही वाखण्याजोगा आहे. दक्षिण भारतीय चित्रपटात तिच्या अभिनयाची खात्री पटल्यानंतर इलियानाने बॉलिवूडमधील अनेक चित्रपट केले आहेत.

आजकाल अभिनेत्रीच्या चॅट सेशनची बरीच चर्चा होत आहे. अलीकडेच, ‘आस्क मी एनिथिंग सेशन’ दरम्यान अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी बोलली. चाहत्यांनी तिला असंख्य प्रश्न विचारले, जसे की “आपली प्लास्टिक सर्जरी झाली आहे का? त्यावर तिने स्पष्ट शब्दात” नाही “असे उत्तर दिले.

यावेळी, इलियानाच्या एका चाहत्याने तिच्या प्रियकरबद्दल विचारले, “आपल्या प्रियकराचे नाव काय?” यावर इलियानाने तिचा एक कुत्र्या सोबतचा फोटो शेअर केला आणि लिहिले, त्याचे नाव चार्ली आहे.

इलियानाच्या चाहत्याने चॅट सेशनला विचारले “प्रेम म्हणजे काय?” आणि ज्याला तिने “बिनशर्त” म्हटले आणि परत तिच्या कुत्र्याचा फोटो शेअर केला. तिला ज्या प्रकारच्या लोकांसोबत हँग आउट करायला आवडते ह्या बद्दल ही अधिक प्रश्न विचारले. तिने हे देखील उघड केले की तिचा आवडता सहकारी अभिनेता कोण होता?

इलियाना अनेक वर्षांपासून तिचा प्रियकर छायाचित्रकार अँड्र्यू निबॉनशी नात्यामध्ये होती. बातमीनुसार 2019 मध्ये हे दोघेही विभक्त झाले.

इलियानाच्या वर्कफ्रंट्सबद्दल सांगायचे झाले तर यावर्षी तिचे ‘द बिग बुल’ आणि ‘अनफेयर अँड लवली’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडिया आणि मूव्ही टनेल प्रॉडक्शनने संयुक्तपणे या चित्रपटाची घोषणा केली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन बलविंदरसिंग जांजुआ यांनी केले आहे. हा चित्रपट भारतीय समाजातील वर्णभेदामुळे अत्याचार केलेल्या एका सावळ्या मुलीची कहाणी आहे. या चित्रपटात इलियाना ‘लवली’ नावाच्या भूमिकेत दिसणार आहे.

admin