ह्या कारणांमुळे दीपिका आज आहे रणवीर ची बायको नाहीतर असती विजय माल्ल्याची सून

ह्या कारणांमुळे दीपिका आज आहे रणवीर ची बायको नाहीतर असती विजय माल्ल्याची सून

मनोरंजन जगतात अफेअर सुरु होणे आणि ब्रेकअप होणे ही अतिशय सामान्य बाब आहे. अभिनेता आणि अभिनेत्रीच्या अफेअरच्या बातम्या आणि ब्रेकअपच्या बातम्या सतत आपल्या कानावर येत असतात आणि त्याची चर्चा देखील सर्वत्र रंगतात. असेच एक गाजलेले अफेअर म्हणजे दीपिका पादुकोण आणि सिद्धार्थ माल्ल्या!

त्याच्या चाहत्यांनाच नव्हे तर, प्रत्येकाला वाटत होते की, दीपिका आणि सिद्धार्थ हे दोघे आता लग्न करतील. मात्र, या दोघांचे अचानक ब्रेकअप झाले आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे दीपिका आणि सिद्धार्थ यांनी स्वत: सोशल मीडियावर त्याचे ब्रेकअप होण्याच्या मागची कारणे देखील जगजाहीर केली होती. यानंतर त्यांच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता. रणबीरपासून वेगळ्या झालेल्या दीपिकाला प्रेमात पुन्हा एकदा एकटे पडावे लागले होते.

दीपिकासिद्धार्थबरोबरच्या ब्रेकअपवर विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना दीपिका म्हणाली की, ‘आमचे नाते वाचवण्याचा मी खूप प्रयत्न केला. पण, सिद्धार्थची वागणूक दिवसेंदिवस विचित्र बनत चालली होती. या नात्यात मला भविष्य दिसत नव्हते. शेवटच्या वेळी आम्ही जेवायला गेलो होतो तेव्हा, त्याने मला बिल भरण्यास सांगितले. ते खूप विचित्र होते. त्यानंतर, मला या नात्यात काहीही दिसले नाही. म्हणून मी हे नाते तोडण्याचा निर्णय घेतला’, असे दीपिकाने म्हटले होते

सिद्धार्थ माल्ल्यात्याचवेळी जेव्हा सिद्धार्थ मल्ल्याला याबद्दल विचारले गेले तेव्हा तो म्हणाला की, ‘माझ्या कठीण काळात दीपिकाने मला कधीच साथ दिली नाही. जेव्हा मी तिला महागड्या भेट वस्तू देत होतो आणि तिच्या मित्रांना पार्टी देत होतो, तेव्हा मी तिच्यासाठी चांगला होतो. नंतर दीपिका हे सगळे विसरली, तिचे वागणे बदलत गेले. हेच आमच्या नात्याच्या तुटण्याचे कारण बनले.’

मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण, विजय माल्ल्याच्या लोकप्रिय ‘किंगफिशर’ या ब्रँडची मॉडेल असायची. किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खानसोबत ‘ओम शांती ओम’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर दीपिकाने एकामागून एक हिट चित्रपट दिले. रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दीपिका खूप दु:खी राहत होती.

त्याचवेळी तिला सिद्धार्थ माल्ल्याचा आधार मिळाला होता. अनेकदा ही जोडी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसायची. सिद्धार्थविषयी जेव्हा दीपिकाला विचारण्यात आले, तेव्हा आपण सिद्धार्थसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे तिने कबुल केले होते. मात्र, काही कालावधीनंतर या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

admin