जोश चित्रपटात ऐश्वर्या सोबत रोमान्स करणारा अभिनेता चंद्रचूर सिंह बघा कसा दिसतो आता..

जोश चित्रपटात ऐश्वर्या सोबत रोमान्स करणारा अभिनेता चंद्रचूर सिंह बघा कसा दिसतो आता..

दररोज एक ना एक अभिनेता हा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करतो आणि एक दोन स्टार बॉलीवूड सोडतो ही इंडस्ट्री मधली खुप छोटी गोष्ट आहे. बॉलीवूडचे जग अनोखे आहे. ऐश्वर्या राय ही यशस्वी अभिनेत्री म्हणून गणली जाते. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सलमान खानपासून ते हृतिक रोशनपर्यंत यांच्यासोबत ती मोठ्या पडद्यावर दिसली आहे.

पण चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्यासोबतची ऐश्वर्याची जोडी ही लोकांना खूप आवडली. तो अभिनेता दुसरा कोणी नसून चंद्रचूर होता. जोश या चित्रपटात ऐश्वर्या आणि चंद्रचूर यांची ऑन-स्क्रीन जोडी खूप मस्त बनली होती. या चित्रपटात शाहरुख खान आणि प्रिया गिल यांनीही काम केले होते पण मोठ्या पडद्यावर ऐश्वर्या आणि चंद्रचूर यांची जोडी लोकांना खूप आवडली.

चंद्रचूर यांचा पहिला चित्रपट पाहून भविष्यात ते चित्रपटसृष्टीत मोठे नाव कमावतील असा अंदाज बांधला जात होता, मात्र त्यांनी लवकरच चित्रपटसृष्टी सोडली. अलीकडच्या काळात या अभिनेत्याचा फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेता पूर्णपणे नवीन लूक आणि स्टाईलमध्ये दिसत आहे. त्याला पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

अभिनेत्याची फिल्मी कारकीर्द फार मोठी नव्हती पण त्याने इतक्या कमी वेळातही उत्तम काम केले. जोश या चित्रपटाशिवाय बेताब, दाग यांसारख्या चित्रपटातही तो दिसला होता. हळूहळू त्याची फिल्मी करिअर मंदावली. यामुळे तो चित्रपटसृष्टीतून गायब झाला.अलिकडेच या अभिनेत्याने आपला ताजा फोटो शेअर करून चाहत्यांच्या भूतकाळातील आठवणी ताज्या केल्या आहेत.सध्या हा अभिनेता ५३ वर्षांचा झाला आहे.त्याचा फोटो पाहून चाहते त्याला ओळखू शकत नाहीयेत.

admin