कोणी ‘लोलो’ तर कोणी ‘चिरकुट’, ही आहेत तुमच्या आवडत्या अभिनेत्यांची टोपण नावे..

कोणी ‘लोलो’ तर कोणी ‘चिरकुट’, ही आहेत तुमच्या आवडत्या अभिनेत्यांची टोपण नावे..

प्रत्येक व्यक्तीला एकतरी टोपणनाव म्हणजेच निकनेम हे असतंच असतं. सर्वसामान्यांप्रमाणेच बॉलिवूडमध्येदेखील असे अनेक कलाकार आहेत ज्यांना घरी लाडाने किंवा निकनेमनेच बोलावलं जातं. त्यामुळे निकनेम असलेले सेलिब्रिटी कोणते आणि त्यांची टोपणनावं कोणती ते जाणून घेऊयात.

ऋषी कपूर:

बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांचं निधन होऊन बराच काळ लोटला आहे. मात्र, त्यांची लोकप्रियता तसूभरदेखील कमी झालेली नाही. आजही ते त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांच्या स्मरणात आहेत. लोकप्रिय असलेल्या ऋषी कपूर यांना घरी प्रेमाने चिंटू या नावाने बोलावलं जातं. विशेष म्हणजे त्यांचं हे निकनेम अनेक चाहत्यांनादेखील माहित आहे.

रणबीर कपूर:

वडील ऋषी कपूर यांच्याप्रमाणेच रणबीरचंदेखील निकनेम आहे. मात्र, या नावाने केवळ त्याची आई नीतू कपूर याच त्याला बोलवतात. रणबीरचं निकनेम ‘रेमंड’ असं आहे. रणबीर कायम फीट राहण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे नीतू कपूर या त्याला ‘रेमंड’ म्हणतात.

हृतिक रोशन:

आपल्या स्मार्टनेसमुळे अनेक तरुणींच्या मनावर राज्य करणाऱ्या ऋतिकचं निकनेम ‘डुग्गू’ असं आहे. विशेष म्हणजे रोशन कुटुंबात राकेश रोशन यांना गुड्डू म्हणतात, त्याचप्रमाणे हृतिकला डुग्गू म्हणतात.

करीना कपूर:

अभिनेत्री करीना कपूर खानचं निकनेम साऱ्यांनाच ठावूक आहे. करीनाला घरी ‘बेबो’ या नावाने बोलावलं जातं. विशेष म्हणजे अनेकदा चाहतेदेखील तिला याच नावाने बोलावतात.

करीनाप्रमाणेच करिश्माचं निकनेम असून तिला प्रेमाने ‘लोलो’ म्हटलं जातं. कपूर कुटुंबात अनेकांना निकनेम असल्याचं यावरुन दिसून येतं.

अक्षय कुमार:

खिलाडी कुमार या नावाने खासकरुन ओळखल्या जाणाऱ्या अक्षय कुमारचंदेखील एक निकनेम आहे. अक्षयला घरात ‘राजू असं म्हटलं जातं.

श्रद्धा कपूर:

आपल्या मस्तीखोर स्वभाव आणि अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या श्रद्धा कपूरला ‘चिरकुट’ असं म्हटलं जातं. श्रद्धाचं हे निकनेम अभिनेता वरुण धवन आणि तिच्या लहानपणीच्या मित्रांनी दिलं आहे.

प्रियांका चोप्रा:

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या प्रियांकाचं मिमी असं निकनेम आहे. लहानपणी प्रियांका अनेकांची नक्कल करायची त्यामुळे तिच्या या मिमिक्री करण्यावरुन तिला ‘मिमी हे नवीन निकनेम मिळालं.

admin