‘सैराट’ मधील लं’गड्याच्या प्रेमात पडली ही प्रसिद्ध सुंदर अभिनेत्री…

‘सैराट’ मधील लं’गड्याच्या प्रेमात पडली ही प्रसिद्ध सुंदर अभिनेत्री…

‘सैराट’मधील परश्याच्या मित्राची भूमिका साकारणाऱ्या तानाजीला अजूनही प्रेक्षक विसरले नाहीत. त्याच्या या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. त्याच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रेमाचा अक्षरशः वर्षाव केला होता.

कुठल्याही कलाकार हा सर्वगुणसंपन्न असतो, म्हणजे त्यांच्यामध्ये कोणत्याही शैलीचा अभिनय उत्तम करण्याची कला असते. या कलाकारांसाठी मुख्य ध्येय असतं ते म्हणजे ‘प्रेक्षकांचे मनोरंजन’. हेच ध्येय मनाशी पक्क करून, स्वतःकडून कायम कसा भारी अभिनय करता येईल याकडे लक्ष देणारी मराठमोळी अभिनेत्री जिने मराठी सिनेृष्टीत एंट्री घेतल्यावर अनेकांनी तिच्या सौंदर्यावर व अभिनय कौशल्यावर प्रेमाचा वर्षाव केला आणि ती अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री ‘मोनालिसा बागल’.

अभिनेत्री मोनालिसाचा लवकरच अजून एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येतआहे. आगामी चित्रपट ‘गस्त’मध्ये मोनालिसा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता तानाजी आणि अभिनेत्री मोनालिसा बागल ही जोडी पहिल्यांदाच या प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळेल. दोघेही कमालीचे कलाकार असल्यामुळे त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री ही जबरदस्त असेल अशी आशा आहे.

‘सैराट’ या सुपरहिट चित्रपटातील लोकप्रिय कलाकार बाळ्या म्हणजेच अभिनेता तानाजी याच्या सोबत काम करण्याची ही मोनालिसाची पहिलीच वेळ असेल. बाळ्या प्रमाणेच ‘गस्त’ मधील तानाजी आणि मोनालिसा यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री नक्कीच रंजक असेल.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अभिनेत्री मोनालिसा म्हणाली, “मी ‘गस्त’ या चित्रपटात सुजाता नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. ती खूपच चंचल व्यक्तिरेखा आहे. सुजाता अमर नावाच्या मुलाच्या प्रेमात पडते आणि त्याला भेटण्यासाठी ती कुठलेही खोटे करण सांगताना मागे पुढे पाहत नाही. मी पहिल्यांदाच तानाजीसोबत काम केलं आहे आणि त्यांच्या सारख्या उत्तम अभिनेत्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. ही एक अनोखी प्रेम कहाणी आहे आणि प्रेक्षकांना पाहताना खूप मजा येईल.”

या नवीन भूमिकेबद्दल बोलताना अभिनेता तानाजी म्हणाला, “मी ‘गस्त’ या चित्रपटात अमर नावाच्या मुलाची भूमिका साकारतोय. तो एका मुलीच्या प्रेमात असतो आणि ज्या गावात राहतोय त्या गावात पहारा देत असताना त्या मुलीला तो चोरून भेटत असतो. त्यांच्या ही रोमांचक प्रेमकथा पुढे काय वळण घेते हे प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मी एका गावाकडच्या मुलाची भूमिका साकारतोय आणि प्रेक्षकांना देखील ती नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.”

admin