प्रिती झिंटा आणि राणी मुखर्जीच्या मैत्रीत का आला दुरावा, जाणून घ्या याबद्दल

बॉलिवूडमध्ये जितके लवकर नाते बनते तितके लवकर ते तुटते. यात शंका नाही की सिनेइंडस्ट्री एका कुटुंबासारखे आहे. पण या कुटुंबात गटबाजी फार चालते. तेदेखील सर्वात जास्त होते जेव्हा ज्या चित्रपटात एका पेक्षा जास्त नायिका असतात.असे म्हटले जाते की कधी दोन अभिनेत्री एकमेकांच्या मैत्रिणी बनू शकत नाही. या म्हणण्याला काहींनी चुकीचे ठरविले. एकेकाळी या यादीत राणी मुखर्जी आणि प्रिती झिंटाच्या नावाचा समावेश होता.

९० आणि २०००च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी प्रिती झिंटा आणि राणी मुखर्जी यांनी कित्येक चित्रपटात एकत्र काम केले आहे आणि यादरम्यान त्या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. त्या दोघींनी ‘चोरी चोरी चुपके चुपके’, ‘वीर-ज़ारा’, ‘कभी अलविदा ना कहना’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. मात्र त्या दोघींच्या मैत्रीला कुणाची तरी नजर लागली.

हे तर सर्वांना माहिती आहे की राणी मुखर्जी काजोलची कजिन सिस्टर आहे. म्हणजेच ती सिनेइंडस्ट्रीत एकटी नाही. राणीचा कजिन भाऊ अयान मुखर्जी बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. प्रिती झिंटाचे बॅकग्राउंड फिल्मी नाही. त्यामुळे ती स्वतःला आऊटसाइडर मानते. प्रितीची राणीसोबत खूप चांगली मैत्री होती.

तरीदेखील तिला नेहमी वाटायचे की राणी तिच्यापेक्षा कमी आणि ऐश्वर्या रायच्या जास्त जवळ आहे. खरेतर राणी आणि ऐश्वर्या त्यांच्या करिअरच्या सुरूवातीला खूप चांगल्या फ्रेंड्स होत्या. राणीची प्रिती आणि ऐश्वर्या या दोघींसोबत चांगली मैत्री होती, मात्र बॉलिवूडमधील कॉम्पिटेशनमुळे तिघींच्या मैत्रीत फूट पडली आणि या तिघी एकमेकींच्या माजी सहकलाकार राहिल्या.

हळूहळू राणी आणि प्रितीमधील मैत्री संपलू आणि दोघींना एकमेकींचे केलेले कौतूकदेखील पचत नव्हते. तसे तर आपल्याला माहित आहे की प्रिती झिंटा आणि राणी मुखर्जी या दोघींनी यश चोप्रा यांच्या बऱ्याच सिनेमात काम केले आहे. एकदा तर यश चोप्रा यांनी प्रिती झिंटाला बेस्ट एक्ट्रेस म्हटले होते जे राणीला अजिबात आवडले नव्हते.

इतकेच नाही तर राणी एकदा सगळ्यांसमोर म्हटले होते की कधीही दोन अभिनेत्री एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाहीत.