“लाल दुपट्टे वाली” फेम हि अभिनेत्री आठवतेय का? आता दिसतेय इतकी हॉट विश्वास नाही बसणार..

90 च्या दशकातील ‘लाल दुप्पटेवाली…’ हे बॉलिवूड साँग तुम्हाला आठवत असेलच. यात गोविंदाची हिरोईन होती रितू शिवपुरी. ही रितू आज बॉलिवूडमधून गायब झालीये. गोविंदासोबतचा ‘आंखें’ हा रितूचा पहिला सिनेमा. 1993 साली रिलीज झालेल्या या सिनेमानंतर रितूचा एकही सिनेमा कमाल दाखवू शकला नाही.

आँखे चित्रपटानंतर रितू शिवपुरीने बऱ्याच चित्रपटात काम केले. हम सब चोर हैं, आर या पार, भाई भाई, हद कर दी आपने, लज्जा, शक्ति: द पावर व ऐलान या सिनेमात ती दिसली. रितूने काही वर्षं बॉलिवूडमध्ये नशीब आजमावले. पण यश मिळत नाही म्हटल्यावर ती बॉलिवूडमधून बाहेर पडली. आजारी पतीसाठी तिने करिअर सोडले.

यानंतर काही वर्षांनी पुन्हा तिने बॉलिवूडमध्ये परतण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी तिच्या पतीचे आजारपण आडवे आले. तिच्या पतीला ट्युमर झाल्याचे निदान झाले आणि त्याच्यासाठी रितूने करिअरवर पाणी सोडले.

करिअरपेक्षा पतीचे आयुष्य महत्त्वाचे आहे, असा विचार करून तिने कमबॅकचा विचार सोडून दिला. मुलं मोठी झाल्यावर 2016 साली अनिल कपूरच्या ‘24’ या शोमधून तिने वापसी केली. रितूने बॉलिवूडमधून ब्रेक घेतल्यानंतर ज्वेलरी डिझायनर म्हणून काम केले. रितू ही अभिनेता ओम व सुधा शिवपुरी यांची मुलगी.

हरी व्यंकटसोबत रितूने लग्न केले. तिला तीन मुलं आहेत. रितूचे आईवडील आधीच बॉलिवूडमध्ये सक्रिय होते. त्यामुळे इंडस्ट्री म्हणजे तिच्यासाठी दुसरे घर होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर रितूने मॉडेलिंग सुरू केले. याचदरम्यान एक दिवस पहलाज निहलाली यांनी तिला पाहिले आणि ‘आंखें’ हा सिनेमा तिला ऑफर केला. यावेळी ती 17 वर्षांची होती. 2006 मध्ये बॉलिवूड सोडल्यानंतर रितूने छोट्या पडद्यावर नशीब आजमावण्याचे प्रयत्न केले.

एका टीव्ही शोमध्ये ती दिसली. पण यासाठी तिला 18 ते 20 तास काम करावे लागायचे. ती कामावरून घरी परतायची तेव्हा नवरा झोपलेला असायचा. करिअरच्या नादात रितूचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ लागले होते. अखेर रितूने अ‍ॅक्टिंगला कायमचा रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला.

२००६ मध्ये रितू शिवपुरी फिल्म इंडस्ट्रीपासून दूर गेली. याचवर्षी एक पंजाबी चित्रपट एक जिंद एक जान मध्ये तिला शेवटचे पाहिले गेले होते, या चित्रपटामधील तिच्या भूमिकेला लोकांनी खूपच पसंती दिली. ११ वर्षे फिल्म इंडस्ट्रीपासून ब्रेक घेतल्यानंतर रितूने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. २०१७ मध्ये इस प्यार को क्या नाम दूं या सिरीयलमध्ये अभिनय करताना दिसली होती. या सिरीयल मध्ये रितूने शिवानी तोमरच्या आईची भूमिका साकारली होती जिला लोकांनी भरभरून प्रेम दिले.

रीतुने एका मुलाखतीदरम्यान आपल्या अ‍ॅक्टिंगच्या दुनियेमधील पुनरागमनाबद्दल सांगितले कि, २००६ ला जेव्हा पंजाबी चित्रपटासाठी १८ ते २० तास काम करून घरी परतत होते तेव्हा माझे पती मला झोपलेलेच दिसायचे. मी या गोष्टीवरून खूप अस्वस्थ व्हायचे कि करियरच्या चक्करमध्ये मी माझ्या फॅमिलीसोबत वेळ घालवू शकत नव्हते, मी खूपच लकी आहे माझे पती खूपच साधे आणि सरळ आहेत आणि त्यांनी कधीच माझ्या कामाबद्दल तक्रार केली नाही, पण हे काम माझ्यावर इतके हावी झाले कि मी अ‍ॅक्टिंग सोडून काही वर्षे कुटुंबासमवेत घालवण्याचा निर्णय घेतला.