संजय दत्तची पत्नी मान्यता हिंदू नसून आहे मुस्लिम, संजय दत्त चे तीन तर मान्यता झाले आहे 2 लग्न…..

संजय दत्तची दुसरी पत्नी मान्यता दत्तचा 22 जुलै 2021 यादिवशी 42 वा वाढदिवस झाला. तीचा जन्म मुंबईत झाला आहे. याशिवाय ती काही काळ दुबईमध्येही राहिली आहे. मान्यता दत्तचे खरे नाव दिलनवाज शेख आहे. जी अगदी सुरुवातीपासूनच बॉलिवूडकडे आकर्षित राहीली आहे. ज्यासाठी त्याने खूप संघर्षही केला. त्याचवेळी संजय दत्तशी लग्न करण्यापूर्वी ती इतरही अनेक वादात अडकली होती.

जेव्हा संजय दत्त 2013 मध्ये तुरूंगात गेला होता. तेव्हा दोन मुलांची आई, मान्यताने एकटीने मुलांची काळजी घेतली. साडेतीन वर्षे ती एकट्याने मुलांची काळजी घेत होती. दुसरीकडे, मान्यता दत्तच्या बॉलिवूड प्रवासाबद्दल बोलले तर, तिचे बॉलिवूडमधील नाव होते ‘सारा खान’. तसेच ती ‘लव्हर्स लाइक अस’ या नावाच्या सी ग्रेड चित्रपटातही दिसली आहे.

याशिवाय प्रकाश झाच्या ‘गंगाजल’ या चित्रपटामध्येही तीने आयटम नंबर केला होता. संजय दत्त आणि मान्यता यांच्या एकत्रिकरणाबद्दल बोलले तर, संजय दत्त व मान्यता दत्त यांची भेट नितीन मनमोहन ने केली होती. ज्यानंतर ते दोघे जवळ येऊ लागले. त्यानंतर मान्यता दत्त संजय दत्तसह सर्वत्र दिसू लागली. त्यानंतर या दोघांचे लग्न हिंदू रीतीरिवाजांनुसार झाले.

संजय दत्तच्या कुटुंबातील सदस्यांनी या लग्नामद्ये सहभाग घेतला नव्हता, कारण संजय दत्तचे कुटुंब या लग्नामुळे आनंदी नव्हते. जेव्हा संजय दत्तने मान्यतासोबत लग्न केले होते. तर त्याचे हे तिसरे लग्न होते. त्याचवेळी मान्यता दत्तने यापूर्वी एकदा लग्न केले होते. हिंदू रूढीनुसार संजय दत्त आणि मान्यता यांचे फेब्रुवारी 2008 मध्ये लग्न झाले होते.

यापूर्वी संजय दत्तचे रिचा शर्मा आणि रिया पिल्लई यांच्याशी लग्न झाले होते. 2010 मध्ये, मान्यताने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. ती केवळ संजय दत्तचे घरच सांभाळत नाही तर ती त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसची सीईओ देखील आहे. संजूला सर्व काळ पाठिंबा दिल्यामुळे लोक मान्यताला ‘आयर्न लेडी’ म्हणून देखील संबोधतात. इतकेच नाही तर मान्यता दत्त संजय दत्तपेक्षा 19 वर्षांनी लहान आहे.

मान्यताने 2005 साली मिरज उर रहमान नावाच्या व्यक्तीशी पहिले लग्न केले होते, परंतु तो कोण आहे आणि तो कोठे आहे. आजपर्यंत कोणालाही याबद्दल कोणतीही बातमी नाहीये. इतकेच नाही तर संजय दत्तचे नाव अनेक महिलांशी जोडले गेले आहे, परंतु संजय दत्तने 1987 मध्ये रूचा शर्माशी लग्न केले होते, पण 1996 मध्ये ब्रेन ट्यूमरमुळे रूचा अमेरिकेतच मरण पावली.

या लग्नापासून त्यांना एक मुलगी त्रिशला आहे जी आता अमेरिकेत राहत आहे. यानंतर संजयने मॉडेल रिया पिल्लईशी लग्न केले, पण वर्ष 2005 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.