एकेकाळी होता न’क्षल-वादी आज आहे बी जे पी खासदार, जाणून घ्या ह्या कोण आहे हा अभिनेता..

एकेकाळी होता न’क्षल-वादी आज आहे बी जे पी खासदार, जाणून घ्या ह्या कोण आहे हा अभिनेता..

बॉलिवूड मधून अनेक लोक राजकारणात येत आहेत. हेमा मालिनी ते शत्रुघ्न सिन्हा पर्यंत अनेक लोक जे पूर्वी अभिनेते होते आज राजकारणात नाव कमवत आहेत.

बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती रविवारी भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झाला. मिथुन चक्रवर्ती यापूर्वी टीएमसीच्या वतीने राज्यसभेचे खासदार होते. मिथुन एक अभिनेता तसेच एक यशस्वी उद्योगपती आहे.

मिथुनचा लक्झरी हॉटेल व्यवसाय आहे. रिपोर्ट्सनुसार, ऊटी येथे त्याच्या हॉटेल मॉर्नार्कमध्ये ५९ खोल्या, ४ लक्झरी फर्निश केलेल्या स्वीट्स, हेल्थ फिटनेस सेंटर, इनडोअर स्विमिंग पूल अशा सुविधा आहेत.

जेमिनीच्या मोनार्क सफारी पार्क मसीनागुरीमध्ये १६ बंगले, १४ ट्री हाऊसेस, फोर स्टार खोल्या, मल्टीक्युसिन रेस्टॉरंट्स, मुलांचे खेळाचे मैदान तसेच घोडेस्वारी आणि जीप राइडिंग जंगल राइड्स आहेत.

हॉटेलशिवाय मिथुन चक्रवर्ती यांचे मुंबईत दोन बंगले आहेत. पहिला वांद्रे आणि दुसरा मड आयलंड ला. मिथुन चक्रवर्ती यांना कुत्री पाळायचा ही शौक आहे. त्यांच्याकडे एक किंवा दोन नव्हे तर ७६ कुत्री आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार मिथुन चक्रवर्ती यांच्या घरात असलेले सर्व प्राणी मोठ्या एसी रूममध्ये ठेवलेले आहेत. कुत्र्यांव्यतिरिक्त मिथुनच्या घरातही अनेक अनोख्या पक्ष्यांचा संग्रह आहे.

कोलकाता येथे १६ जून १९५० रोजी जन्मलेल्या मिथुन चक्रवर्ती यांचे खरे नाव ‘गौरांग चक्रवर्ती’ आहे. त्यांचा मृगया हा पहिला चित्रपट १९७६ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यांनी ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ राज्य केले.

मिथुन चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी नक्षलवादी गटाचा सदस्य होता परंतु अपघातात त्याचा एकुलता भाऊ गमावला. यानंतर त्यांनी नक्षलवादी चळवळ सोडली.

admin