धक्कादायक खुलासा ! अभिनेत्री भाग्यश्रीने पतीबद्दल सांगितली धक्कादायक बाब, म्हणाली- एकेकाळी सर्व त्याला..

धक्कादायक खुलासा ! अभिनेत्री भाग्यश्रीने पतीबद्दल सांगितली धक्कादायक बाब, म्हणाली- एकेकाळी सर्व त्याला..

बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्रीने यशाच्या शिखरावर असताना अचानक बॉलिवूडपासून लांब जाण्याचा निर्णय घेतला. तिने लग्नानंतर चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या या निर्णयामुळे चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला होता.

त्याकाळी सोशल मीडियावरील ट्रोलिंग हा प्रकार नव्हता मात्र तरी देखील भाग्यश्रीच्या या निर्णयासाठी तिच्या पतीला जबाबदार धरत चाहत्यांनी त्याला शिव्या घातल्या होत्या. याबाबत खुद्द भाग्यश्रीनेच एका मुलाखतीत सांगितले.

भाग्यश्रीने मुलाखतीत सांगितले की, लोकांना आयुष्यात हवे असते ते सर्व स्टारडम मला मिळाले. पण मी बॉलिवूडला राम राम करण्याचा निर्णय घेतला. मला लग्न करायचे होते. मात्र चाहत्यांनी त्या साठी माझ्या पतीला जबाबदार धरले. तो बिचारा मला बॉलिवूडपासून दूर केले म्हणून चाहते त्याला शिव्या शाप देत होते.

कदाचित त्यावेळी मी एकटीच असेन जी त्याच्यावर प्रेम करायचे. आम्ही दोघेही तेव्हा तरुण होतो, एकमेकांच्या प्रेमात पडलेलो. त्यामुळे आपल्या बायकोकडे कुणी पाहू नये, ती आकर्षणाचा बिंदू ठरू नये असे त्याला वाटत होते पण ते मी समजू शकते.

मैने प्यार किया चित्रपटात सलमान खानसोबत भाग्यश्री दिसली होती. या चित्रपटाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. भाग्यश्रीला चित्रपटाच्या अनेक ऑफर्स येत होत्या. मात्र त्या ऑफर्सला नकार देत भाग्यश्रीने संसारात रुळण्याचा निर्णय घेतला होता.

काही वर्षापूर्वी भाग्यश्रीने मालिकांमधून छोट्या पडद्यावर कमबॅक केले होते. ती लौट आओ त्रिशा या मालिकेत दिसली होती. लवकरच आता ती प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या राधे श्याम व कंगना रनौतच्या थलाइवी या चित्रपटात दिसणार आहे.

admin