‘बादशाह’ सिनेमातली ही चिमुरडी आता दिसते खुपच वेगळी, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल हीच का ती?

‘बादशाह’ सिनेमातली ही चिमुरडी आता दिसते खुपच वेगळी, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल हीच का ती?

हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्गज कलाकारांची मुलं आणि मुली आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेमात आपलं नशीब आजमावतात. गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत ही परंपरा सुरु आहे. आपल्या घरात सुरु असलेला अभिनयाचा वारसा दिग्गज कलाकारांची मुलं मुली पुढे नेत असतात.

सध्या बॉलीवुडमध्ये अनेक दिग्गज कलाकारांची मुलं-मुली सिनेमात एंट्री करत अभिनयाचा श्रीगणेशा केला आहे. मात्र अशीही काही बालकलाकार आहेत ज्यांनी छोट्या भूमिका साकारल्या असल्या तरी आजही रसिकांच्या लक्षात आहेत. मात्र काही बालकलाकार पुढे सिनेमात झळकलेच नाहीत. याच यादीत शाहरूख खानसह काम कलेली या चिमुरडीला आजही कोणी विसरलेले नाही.

करिष्मा जैन असे या चिमुरडीचे नाव आहे. सिनेमात अतिशय खोडकर आणि टामबॉय दिसणारी ही मुलगी आता बरीच मोठी झाली आहे. काळानुसार तिच्यात खूप बदलही झाला आहे. व्हायरल झालेल्या फोटोत करिष्मामध्ये कमालीचा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. करिष्मा आता २८ वर्षांची झाली आहे.

पूर्वीपेक्षाही ती अधिक सुंदर दिसू लागली आहे. तिचे विविध अंदाजातील फोटोंवर लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळते. बादशाह सिनेमानंतर ती कोणत्याही सिनेमात झळकली नाही. तिला अभिनयाची आवड नसल्यामुळे तिने सिनेमापासून लांबच राहणे पसंत केले.

२०१५ साली करिष्माने अभिषेक छाजेड सोबत लग्न करत सेटल झाली आहे. ती कधीच प्रकाशझोतात येत नाही. कोणत्याही बॉलिवूड पार्ट्या, पुरस्कार सोहळे यामध्येही हजेरी लावत नाही त्यामुळे तिच्यावर फारशी चर्चाही होत नाही.

admin