स्वतःच्या बायकोला वाऱ्यावर सोडून या अभिनेत्री मागे घायाळ झाला होता अझरुद्दीन.. पण 14 वर्षानंतर पुन्हा तिला सोडून आता..

स्वतःच्या बायकोला वाऱ्यावर सोडून या अभिनेत्री मागे घायाळ झाला होता अझरुद्दीन.. पण 14 वर्षानंतर पुन्हा तिला सोडून आता..

एकेकाळी बॉलिवूडची ‘बिजली’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री संगीता बिजलानी हिचा आज वाढदिवस. आज ती तिचा 61 वा वाढदिवस साजरा करतेय. 1980 साली संगीतानं मिस इंडियाचा किताब पटकावला होता.

त्यानंतर 8 वर्षांनी बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली. पण फिल्मी करिअर फार काही चालले नाही. चित्रपटांपेक्षा तिच्या खासगी आयुष्याचीच चर्चा जास्त झाली. सलमान खानसोबतच्या नात्यानं तिला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली.

लग्नापर्यंत पोहोचलेलं हे नातं अचानक संपलं आणि एकाकी पडलेल्या संगीताच्या आयुष्यात एका नव्या पुरूषाची एन्ट्री झाली. तो होता क्रिकेटपटू मोहम्मद अजहरूद्दीन. आज संगीता व अजहरूद्दीन यांची लव्हस्टोरी आम्ही सांगणार आहोत.

दोघांची लव्हस्टोरी एखाद्या सिनेमाची स्टोरी वाटावी, इतकी फिल्मी आहे. होय, 1985 ची गोष्ट. एका जाहिरातीचं शूट होतं. याच ठिकाणी अजहर व संगीता पहिल्यांदा भेटले होते. ही पहिलीच भेट अजहरसाठी पुरे होती. कारण या पहिल्याच भेटीत अजहर संगीताच्या सौंदर्यावर भाळला होता.

अजहर विवाहित होता. पण अक्षरश: पहिल्याच नजरेत संगीताच्या प्रेमात पडला होता. मग भेटीगाठी वाढत गेल्या आणि संगीता व अजहर एकमेकांत हरवले. इतके की, दोघांनाही दुरावा सहन होईना. पण लग्न करायचं तर अजहरला त्याच्या पत्नीपासून घटस्फोट घेणं भाग होतं.

अखेर त्याचा निर्णय पक्का झाला आणि त्यानं पत्नी नौरीनंला सगळं काही सांगितलं. अजहरला रोखून फायदा नव्हताचं, नौरीनं तयार झाली. तिनं पतीला लग्नाच्या बंधनातून मुक्त केलं आणि 1996 रोजी अजहर संगीताचा झाला.

सुरूवातीचे दिवस आनंदात गेले. पण काळासोबत नातं पुढं जात असताना या नात्याला दृष्ट लागली. होय, दृष्ट. लग्नाच्या 14 वर्षानंतर दोघांतही खटके उडू लागले. कारण होतं ज्वाला गुट्टा. होय, मीडिया रिपोर्टनुसार, अजहर व बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा यांची वाढती जवळीक संगीताला असह्य झाली होती.

याचमुळं दोघांचा संसार मोडला, असं मानलं जातं. संगीतानं अजहरशी घटस्फोट घेतला. त्याच्यानंतर संगीता दुसऱ्या लग्नाच्या भानगडीत पडली नाही. पण हो, सलमान सोबतची मैत्री तिनं जपली. आजही ती कायम आहे.

admin