ती एक घटना आणि आशिकी गर्ल अनु अग्रवालचे आयुष्य बरबाद, सध्या ग्लॅमर वर्ल्डपासून दूर राहून करत असे काम..

ती एक घटना आणि आशिकी गर्ल अनु अग्रवालचे आयुष्य बरबाद, सध्या ग्लॅमर वर्ल्डपासून दूर राहून करत असे काम..

1990 साली आलेल्या ‘आशिकी’ सिनेमाने अनु अग्रवालला रातोरात स्टार बनवले. अल्पावधीतच रसिकांची आवडती अभिनेत्री बनली होती. वयाच्या २१ व्या वर्षीच तिने अभिनयाला सुरुवात केली होती. तिचे कॉलेज सुरु असताना महेश भट्ट यांनी ‘आशिकी’ सिनेमातून तिला पहिला ब्रेक दिला होता. या सिनेमानंतर अनुने अनेक सिनेमात काम केले.

‘गजब तमाशा’, ‘खलनायिका’, ‘किंग अंकल’, ‘कन्यादान’, ‘बीपीएल ओए’ आणि ‘रिटर्न टू ज्वेल थीफ’ हिंदीच नाही तर इतर भाषांमध्येही तिने काम केले. तामिळ सिनेमा ‘थिरुदा-थिरुदा’आणि शॉर्ट फिल्म ‘द क्लाऊड डोर’मध्येही ती झळकली होती. पण तिला पाहिजे तसे यश मिळाले नाही. 1999 साली झालेल्या एका अपघातानंतर तिचे आयुष्यच बदलून गेले. या अपघातात तिचा स्मृतीभ्रंश झाला आणि ती पॅरालाईज्ड झाली.

जवळपास 29 दिवसांपर्यंत अनु कोमामध्ये होती. 3 वर्ष तिच्यावर उपचार सुरु होते. या उपचारानंतर अनुच्याही तब्येतीत हळूहळू सुधारणा होत गेली. पण तोपर्यंत बॉलिवूडमधून अनुची जादूही कमी झाली होती. यामुळे ग्लॅमर वर्ल्डपासून दूर जात तिने तिला ज्या गोष्टीत आनंद मिळतो त्याप्रकारचे काम करायला सुरुवात केली. अनु अग्रवाल झोपडपट्टीत जाऊन लहान मुलांना योगा शिकवते. अनु अग्रवाल तिचे अनेक फोटोज् नेहमी शेअर करत इतरांनाही फिटनेसचे महत्त्व पटवून देताना दिसते.

काळानुसार अनुच्या लूकमध्येही प्रचंड बदल झाला आहे. आता तिला ओळखणेही कठिण झाले आहे. सिनेमात अनु झळकत नसली तरी आजही तिचे असंख्य चाहते आहेत. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय असते. चाहत्यांसह संवाद साधत असते.

सकारात्मक संदेश देणारे व्हिडीओ ती चाहत्यांसह शेअर करते. तिच्या या व्हिडीओंना चाहतेही प्रचंड लाईक्स कमेंट करत पसंती देतात. तिचे कौतुक करताना दिसतात. आयुष्यात कितीही चढउतार आले तरी अनुने हार न मानता पुन्हा तिच्या आयुष्याची खास सुरुवात केली. यामुळेच इतरांनाही ती प्रेरणा देत असते.

admin