मलायकाच्या कमाईशी तुलना, भडकला अर्जुन कपूर.. “तिची कमाई जास्त असण्यामागचे कारणं आहेत वेगळी..”

मलायकाच्या कमाईशी तुलना, भडकला अर्जुन कपूर.. “तिची कमाई जास्त असण्यामागचे कारणं आहेत वेगळी..”

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर चित्रपटांपेक्षा कमी अन् मलायका अरोरासोबतच्या रिलेशनशिपमुळे अधिक चर्चेत असतो. या ना त्या कारणानं हे जोडपं सतत चर्चेत असतं. आता सेलिब्रिटी म्हटल्यावर चर्चा तर होणार, हेडलाईन्सही बनणार. पण तूर्तास काय तर एका हेडलाईन्समुळे अर्जुन जाम संतापला आहे. होय, इन्स्टास्टोरीवर त्यानं याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

या बातमीत अर्जुन व मलायकाच्या कमाईची तुलना केली गेली होती. ही तुलनाच अर्जुनला खटकली. इन्स्टास्टोरीवर त्यानं याबद्दल नाराजी बोलून दाखवली. ‘2021 मध्ये अशा हेडलाईन्स बनतात, ही दुर्दैवी व लाजीरवाणी बाब आहे. बिल्कुल, ती चांगली कमावते आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिनं अनेक वर्ष मेहनत घेतलीयं. पण याची तुलना कोणाशीही होता कामा नये, अगदी माझ्याशी सुद्धा…,’ अशा शब्दांत अर्जुननं त्याची नाराजी व्यक्त केली.

अलीकडे एका मुलाखतीत अर्जुननं मलायकांचं कौतुक केलं होतं. मलायका एक स्वतंत्र बाण्याची महिला आहे. 20 व्या वर्षांपासून आत्तापर्यंत ती काम करतेय. यामागे तिचे अथक परिश्रम आहेत. मलायकाला मी कधीच तक्रार करताना पाहिले नाही. आजुबाजूला कितीही प्रतिकूल गोष्टी घडोत, ती कधीच तक्रार करत नाही. ती कामाबद्दल बाता मारण्याऐवजी काम संपवण्याकडे तिचा कल असतो.

तिच्या विचारात मी कधीच नकारात्मकता बघितली नाही. आयुष्यात आनंदी कसे राहायचे याचाच ती सतत प्रयत्न करत असते. मी रोज तिच्याकडून नवे काही तरी शिकतो, असे अर्जुन म्हणाला होता.
अर्जुन व मलायकाच्या वयात बरेच अंतर आहे. पण जगाची पर्वा न करता दोघेही प्रेमात पडले आणि कालांतराने जाहिरपणे आपल्या प्रेमाची कबुलीही दिली. हे कपल लवकरच लग्न करणार, अशी चर्चा आहे.

अरबाजबरोबर घ’टस्फो’ट झाल्यानंतर मलायका अर्जुनच्या जवळ आली होती. मलायकाने वर्ष 2017 मध्ये अरबाज खानला घ’टस्फो’ट दिला होता. यानंतर अर्जुन कपूरबरोबर मलायकाची जवळीक वाढू लागली. अर्जुनने मलायकाशी असलेल्या संबंधांची कबुलीही माध्यमांसमोर दिली आहे. मलायकाबरोबर तो बर्‍यापैकी आरामात असल्याचे त्याने स्पष्टपणे सांगितले आहे. अर्जुनच नाही तर मलायकानेही अर्जुनसोबत संबंध असल्याचे कबूल केले आहे. बर्‍याचदा दोघांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होतात.

अर्जुन मलायकाची जोडी सहसा आउटिंगवर एकत्र दिसू शकते. कधी डिनरमध्ये तर कधी समारंभात दोघे एकत्र दिसतात. मलायकाने 1998 साली अरबाज खानशी लग्न केले होते. आणि 19 वर्षानंतर 2017 मध्ये हे दोघे एकमेकांपासून विभक्त झाले. मलायका आणि अरबाज यांना मुलगा अरहान असून तो 17 वर्षांचा आहे. एकीकडे मलाइका अर्जुनशी डेट करत आहे, तर दुसरीकडे अरबाज खान जॉर्जिया अँड्रानीला डेट करत आहे.

admin