‘विरूष्का’च्या मुलीचं नाव काय माहिती आहे का?

‘विरूष्का’च्या मुलीचं नाव काय माहिती आहे का?

काही दिवसांपूर्वी क्रिकेटर विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. अनुष्काने ११ जानेवारी रोजी दुपारी मुलीला जन्म दिला होता. ही आनंदाची बातमी विराटने ट्विट करत दिली होती. पण त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव काय ठेवलं असा प्रश्न अनेकांना पडला होता.

आता अनुष्काने ट्वीट करत मुलीचे नाव सांगितले आहे.अनुष्काने केलेले ट्वीट सध्या चर्चेत आहे. या ट्वीटमध्ये तिने पती विराट आणि मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते अतिशय आनंदी दिसत आहेत. हा फोटो शेअर करत तिने “आमच्या मुलीने, वामिकाने आमचे आयुष्या एका वेगळ्याच स्तरावर नेले आहे!

अश्रू, हसू, काळजी, आनंद या सगळ्या भावना काही मिनिटांच्या कालावधीत आम्ही अनुभवल्या आहेत” या आशयाचे ट्वीट केले आहे. ट्वीट करत अनुष्काने त्यांच्या मुलीचे नाव वामिका असल्याचे सांगितले आहे.त्यासोबत अनुष्काने आणखी एक ट्वीट केले आहे. यात अनुष्का म्हणाली, “तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा, प्रार्थना आणि आर्शिवादासाठी आम्ही आभार मानतो.

“विराट-अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली होती. ऑगस्ट महिन्यात विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट करत ती गरोदर असल्याचं सांगितलं होतं. ‘जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार’, असं कॅप्शन देत विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट केला होता.

लग्नाच्या तीन वर्षांनंतर या दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे.

admin