अनुष्का शेट्टी अडकतेय लग्नबंधनात.. प्रभास ला डच्चू देऊन आता धरलाय क्रिकेटरचा..

अनुष्का शेट्टी अडकतेय लग्नबंधनात.. प्रभास ला डच्चू देऊन आता धरलाय क्रिकेटरचा..

‘बाहुबली’ आणि ‘देवसेना’ ही दोन पात्र साकारत दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी आणि अभिनेता प्रभास प्रेक्षकांच्या भेटीला आले. रुपेरी पडद्यावरील त्यांची केमिस्ट्री जितकी गाजली, तितकीच किंबहुना त्याहून जास्त चर्चेत राहिली ती म्हणजे त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री. पण, आता मात्र या दोघांत तिसऱ्याची एंट्री झाली आहे.

गेल्या बऱ्याच काळापासून अनुष्का आणि प्रभास यांच्या नात्याविषयी फार चर्चा झाली नाही. ‘रिपलब्लिक वर्ल्ड’च्या वृत्तानुसार ते दोघं आता एकत्र नसून, अनुष्का या नात्यापासून बरीच पुढेही गेली आहे. सध्या ती भारतीय क्रिकेट संघातील एका खेळाडूसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. होय, हे खरे आहे की अनुष्का शेट्टी ने आता एका क्रिकेटपटूचा हात धरला आहे.

अनुष्का आणि त्या क्रिकेटपटूचा साखरपुडाही झाला असल्याचं वृत्त आहे. इतकच नव्हे, तर त्यांच्या लग्नाची तयारीही सुरु झाल्याचं कळत आहे. हा क्रिकेटपटू दक्षिण भारतीय नसून, तो मुळचा उत्तर भारतातील असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता हा खेळाडू कोण, असाच प्रश्न कला आणि क्रीडा रसिकांच्या मनात घर करु लागला आहे.

अनुष्का शेट्टी आणि तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असणारा हा खेळाडू यंदाच्या वर्षी लग्नाच्या बेडीत अडककण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे आता तो नेमका कोणता खेळाडू?, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. तिच्या अनेक चाहत्यांना याच्या उत्तराची हुरहूर लागली आहे

अमुक एका खेळाडूसोबत अनुष्काचं नाव जोडलं गेल्यानंतर तीसुद्धा विराट कोहली- अनुष्का शर्मा, हरभजन सिंग- गीता बसरा, हार्दीक- नताशा स्टॅन्कोविक अशा सेलिब्रिटी जोड्यांच्या यादीत गणली जाऊ शकते. आणि ही जोडी देखील वर दिलेल्या सर्व जोडयांइतकीच लोकप्रिय होईल असेही सगळ्यांचे मत आहे.

येत्या काळात अनुष्का ‘निशब्दम’ या चित्रपटातून झळकणार आहे. तामिळ आणि तेलुगू अशा भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हेमंत मधूकर दिग्दर्शित या चित्रपटातून आर. माधवन, अंजली, मायकल मदेसन, सुब्बराजू, शालिनी पांडे आणि श्रीनिवास अवसारला मुख्य भूमिकांमध्ये दिसतील. २१ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

याउलट काही संकेतस्थळांनी अनुष्काच्या लग्नाबाबतची बातमी दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की तिचं लग्न एका दिग्दर्शकासोबत होणार आहे. प्रकाश कोवेलामुदी असं या दिग्दर्शकाचं नाव असून त्याचे वडील राघवेंद्र राव हे देखील तेलुगू चित्रपटसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक आहेत. हे वृत्त प्रसिद्ध झालं असलं तरी अनुष्का किंवा प्रकाश या दोघांपैकी कोणीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाहीये.

प्रकाश याने 2004 साली चित्रपट दिग्दर्शनात पाऊल ठेवलं होतं. बोम्मलता नावाच्या तेलुगू सिनेमापासून त्याने कारकिर्दीला सुरूवात केली होती. 2015 साली त्याने ‘साईझ झिरो’ नावाचा तमिळ आणि तेलुगू अशा दोन भाषांत चित्रपट दिग्दर्शित केला होता.

admin