‘विरुष्का’च्या लेकीचा पहिला फोटो व्हायरल

‘विरुष्का’च्या लेकीचा पहिला फोटो व्हायरल

हे नवं वर्ष सुरू झाल्यापासूनच विराट-अनुष्काच्या (Virat Kohli Anushka Sharma Baby Girl) होणाऱ्या बाळाची चर्चा होते. सोमवारी विराट कोहलीने आम्हाला सांगण्यास आनंद होत आहे…. असं म्हणतं आपल्याला गोंडस मुलगी झाल्याची गोड बातमी शेअर केली. विराट आणि अनुष्काच्या चाहत्यांना ही बातमी कळताच आनंद झाला.

बाळाच्या गोड बातमीनंतर साऱ्यांच्या नजरा या विरुष्काच्या बाळाकडे होत्या. गोंडस मुलीचा व्हिडिओ किंवा फोटो पाहण्यास सारेच उत्सुक होते. सोमवारी दुपारी अनुष्काने चिमुकलीला जन्म दिला. अनुष्का आणि लेक दोघींच आरोग्य उत्तम असून आम्ही खूप आनंदी आहोत, अशी माहिती विराटने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली. यानंतर कोहली कुटुंबातील अनेकांनी आपल्या घरात परीचं आगमन झाल्याचं सांगत आनंद व्यक्त केल्या.

यावेळी विराट कोहलीचे भाऊ विकास कोहली यांनी विरुष्काच्या लेकीचा पहिला व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. काही सेकंदाच्या या व्हिडिओत विरुष्काच्या लेकीचं नाजूक असे पाय दाखवण्यात आले आहेत. घरात लेकीचा जन्म होणं म्हणजे लक्ष्मीचं आगमन असं म्हटलं जातं. तिच्या सुंदर, नाजूक अशा पावलांनी लक्ष्मीच घरात प्रवेश करते असं म्हणतात. तर विकास कोहली यांनी या व्हिडिओसोबत छान कार्टून जोडून विरुष्काच्या लेकीची पहिली झलक चाहत्यांना दाखवली आहे.

त्याचप्रमाणे विराटची बहिण भावना कोहली धिंग्रा यांनी देखील आपण आत्या झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. मुली या देवाचा आशिर्वाद असतो. स्वर्गातूनच मिळालेला जणू हा आशिर्वाद. आत्या झाल्याचा अतिशय आनंद आहे, असं म्हणत भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

विराट आणि अनुष्काच्या बाळाबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती. पण या दोघांनी कायमच आपल्या वैयक्तिक गोष्टी खासगी ठेवण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी विरूष्का क्वालिटी टाइम घालवत होते. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. तेव्हा अनुष्काने यावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच आताही विराटने चिमुकलीच्या जन्माची पोस्ट शेअर करताना आपल्या खासगी आयुष्य खासगीच राहिलं. त्याचा आदर केला जाईल अशी भावना व्यक्त केली आहे.

admin