आपल्या अंकुश चौधरीची बायको देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, लवकरच ह्या मालिकेमधून करणार आहे पडद्यावर कमबॅक

आपल्या अंकुश चौधरीची बायको देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, लवकरच ह्या मालिकेमधून करणार आहे पडद्यावर कमबॅक

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले. अंकुशची पत्नी दिपा परब-चौधरी ही देखील मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर दीपा छोट्या पडद्यावर कमबॅक करते आहे. शेवटची ती ‘अंड्या चा फंडा’ चित्रपटात दिसली होती.

अभिनेत्री दीपा परब-चौधरी छोट्या पडद्यावर कमबॅक करते आहे. याबद्दल तिने इंस्टाग्रामवर मालिकेतील फोटो शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे. ती स्टार प्लस वाहिनीवरील शौर्य और अनोखी की कहानी मालिकेत दिसणार आहे. तिच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

तिचे चाहते तिला पुन्हा एकदा अभिनय करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अंकुश आणि दिपाने २००७ साली लग्न केले. ते दोघे त्यांच्या संसारात प्रचंड खूश असून त्यांना प्रिन्स नावाचा मुलगा देखील आहे. दिपा लग्नानंतर खूपच कमी चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते. शेवटची ती अंड्याचा फंडा या चित्रपटात झळकली होती.

केदार शिंदेच्या ऑल द बेस्ट या नाटकात अंकुश आणि दिपाने एकत्र काम देखील केले आहे. त्यानंतर दिपा परब आपल्याला अनेक जाहिरातींमधून आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तसेच दिपाचा प्रसाद ओक आणि सुबोध भावे सोबतचा क्षण हा सिनेमा अधिक लोकप्रिय ठरला.

‘थोडी ख़ुशी थोडा गम’, ‘छोटी मॉ’, ‘मित’ आणि ‘रेत’ यासारख्या हिंदी मालिकेत ती झळकली आहे.

admin